जेवणावरून 'Bigg Boss 19' च्या घरात महाभारत; बसीर अली अन् नेहलमध्ये कडाक्याचे भांडण, पाहा VIDEO

Bigg Boss 19 Update : 'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच 'वीकेंड का वार' पार पडला आहे. त्यानंतर घरात बसीर अली आणि नेहलमध्ये जेवणावरून मोठे भांडण होताना दिसते.
Bigg Boss 19 Update
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस 19'च्या घरात आवेज दरबारचा पत्ता कट झाला आहे.

घरात जेवणावरून बसीर अली आणि नेहलमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने बसीर अली, अमाल मलिक यांना खडेबोल सुनावले आहेत.

'बिग बॉस 19' च्या (Bigg Boss 19) घरात नुकताच 'वीकेंड का वार' पार पडला आहे. या 'वीकेंड का वार'मध्ये बिग बॉसच्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट झाला आहे. कमी मते मिळाल्यामुळे आवेजला घरातून बाहेर जावे लागले आहे. 'वीकेंड का वार' संपताच घरात पुन्हा मोठी भांडणे झालेली पाहायला मिळत आहे. नुकताच बिग बॉसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात बसीर अली आणि नेहल भांडताना दिसत आहे. नेमकं झाले काय, जाणून घेऊयात.

'बिग बॉस 19' च्या घरात रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. शो दिवसेंदिवस अधिक रंजक होत जात आहे. जेवणावरून बसीर अली (Baseer Ali) आणि नेहल (Nehal Chudasama ) यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुनिका नेहलला विचारते की, "हलवा खाल्ला का?" तेव्हा नेहल "नाही" म्हणत फ्रिजमधील हलवा पाहण्यासाठी निघते. पण बाऊलमध्ये हलवा खूप कमी सापडतो. जे पाहून नेहलचा पारा चढतो. तेव्हा कुनिका बोलते की, "हे बसीर अलीचे काम आहे."

नेहल बसीरकडे हलव्याचा जाब विचारायला जाते. तेव्हा त्यांच्यात मोठे भांडण होते. नेहल बसीरवर चोरी केल्याचा आरोप लावते. यामुळे बसीर अली खूप भडकतो. त्यांच्यात शारीरिक हाणामारी होणार तेवढ्यात कुनिका तेथे येऊन त्यांच्या भांडणात हस्तक्षेप करते. भांडण थांबवण्याचा प्रयत्न करते. घरात जेवणावरून नवीन महाभारत घडते.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओत शेवटी गौरव खन्ना आणि अभिषेक बजाज मोठ्याने हसताना दिसत असतात. तर अमाल मलिक स्वयंपाकघरात या सर्वांची मजा घेताना दिसत आहे. आता बिग बॉसच्या घरात नवीन कोण कॅप्टन होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Bigg Boss 19 Update
Rupali Bhosale : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गाडीचा भयंकर अपघात, नव्या कोऱ्या कारची झाली वाईट अवस्था

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com