Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’मध्ये फराह खानने घेतली सदस्यांची शाळा; बसीर-नेहलची तुटली मैत्री, कुनिकाला सुनावले खडे बोल

Bigg Boss 19 Weekend Ka Vaar: बिग बॉस १९ च्या ‘वीकेंड का वार’ भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. यावेळी सलमान खान ऐवजी यावेळी फराह खान होस्ट म्हणून मंचावर आली.
Bigg Boss 19 Weekend Ka Vaar
Bigg Boss 19 Weekend Ka VaarSaam Tv
Published On

Bigg Boss 19: बिग बॉस १९ च्या ‘वीकेंड का वार’ भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. यावेळी सलमान खान ऐवजी यावेळी फराह खान होस्ट म्हणून मंचावर आली. सलमान त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमुळे व्यस्त असल्याने फराहने ही जबाबदारी स्वीकारली आणि घरातील सदस्यांना चांगलेच धारेवर धरले.

या भागात चर्चेत राहिला तो म्हणजे बसीर अली. बसीरने घरातील इतर स्पर्धकांविषयी अपमानास्पद वक्तव्य करत त्यांना “कमकुवत” आणि “या सिझनला न शोभणारे” असे म्हटले. त्यावर फराहने संताप व्यक्त करत बसीरला फटकारले आणि त्याची वृत्ती चुकीची असल्याचे स्पष्ट केले.

Bigg Boss 19 Weekend Ka Vaar
Disha Patani: घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर दिशा पटानीचा पहिला पब्लिक अपीयरन्स; पाहा व्हायरल VIDEO

दरम्यान, नेहल चुदासामावर फराहने अधिक रोष व्यक्त केला. एका टास्कदरम्यान नेहलने अमल मलिकवर ‘बॅड टच’ केल्याचा आरोप केला होता. हा मुद्दा उपस्थित करत फराहने तिला जाब विचारला आणि सांगितले की अशा प्रकारचे आरोप सहजासहजी करणे योग्य नाही. फराहने नेहलला ‘वुमन कार्ड’ वापरल्याबद्दलही सुनावले.

Bigg Boss 19 Weekend Ka Vaar
Vicky Jain Hospitalized: अंकिता लोखंडेच्या नवऱ्याची तब्येत बिघडली, विकी जैनला रुग्णालयात केलं दाखल

अमल मलिकलाही फराहने टोमणा मारला. सतत माफी मागण्याच्या त्याच्या सवयीवर तिने कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. तसेच, घरातील सिनियर मेंबर कुनिका सदानंदलाही फराहने जेवण आणि वैयक्तिक गोष्टींवरील वर्तनाबद्दल फटकारले

या भागात फराहच्या कठोर वागण्यामुळे घरातील सदस्य पूर्णपणे गप्प झाले आणि वातावरण चांगलेच रंगले. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी आणखी एक सरप्राईज म्हणजे अभिनेता अरशद वारसीचा शोमध्ये झालेला स्पेशल प्रवेश. एकूणच, या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये फराह खानची धडाकेबाज होस्टिंग आणि सदस्यांवरील तिने केलेली कडक टिका प्रेक्षकांना खूप भावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com