Disha Patani: घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर दिशा पटानीचा पहिला पब्लिक अपीयरन्स; पाहा व्हायरल VIDEO

Disha Patani Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर झालेल्या फायरिंगच्या घटनेनंतर दिशाने पहिला पब्लिक अपीयरन्स दिला आहे.
Disha Patani Viral Video:
Disha Patani Viral Video:Saam Tv
Published On

Disha Patani: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर झालेल्या फायरिंगच्या घटनेनंतर दिशाने पहिला पब्लिक अपीयरन्स दिला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कॅल्विन क्लेनच्या विशेष कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. या कार्यक्रमात दिशा पाटनी ब्लॅक ड्रेस आणि हाय हील्समधील ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. यावेळी तिने रेड कार्पेटवर कॅमेऱ्यासमोर हसत पोझ दिली.

काही दिवसांपूर्वी बरेलीतील तिच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या फायरिंगमुळे पाटनी कुटुंब हादरले आहे. दिशाचे वडील जगदीश पाटनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बाइकस्वारांनी अचानक घराजवळ येत अंदाजे ८ ते १० गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून तपास सुरू आहे.

Disha Patani Viral Video:
Firing Case: दिशा पाटनीपासून ते सलमान खान पर्यंत; 'या' सेलिब्रिटींच्या घरावर कोण करतयं हल्ले?

दरम्यान, या घटनेनंतर दिशाच्या या पहिल्या पहिला पब्लिक अपीयरन्सने चाहत्यांचे आणि बॉलिवूडमधील कलाकारांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री मोनी रॉय हिने सोशल मीडियावर दिशाच्या पोस्टवर “माय बेबी” असे लिहून आपला प्रतिसाद दिला. तर अनेक चाहत्यांनी दिशा पाटनीच्या धैर्याचे कौतुक करत, "तुझे कुटुंब किंवा तू एकटी नाहीस दिशा" असे बोलून धीर दिला आहे. यासह अभिनेत्री जॅकलिन फर्नांडेझने देखील कमेंट केली आहे.

Disha Patani Viral Video:
Dilip Prabhavalkar: 'कलाकार झालो, पण बाबा नव्हते...'; अभिनय करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या वडीलांच्या आठवणीत दिलीप प्रभावळकर भावुक

या सगळ्या प्रतिक्रियांमधून दिशा पाटनीबद्दल चाहत्यांचे आणि सेलेब्सचे प्रेम स्पष्ट दिसून आले. बरेलीतील घटनेनंतरचा तणाव अजूनही सुरू असला, तरी न्यूयॉर्कमधील या कार्यक्रमात आत्मविश्वासाने हजेरी लावून दिशाने आपली धैर्यशील प्रतिमा पुन्हा अधोरेखित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com