Shruti Vilas Kadam
दिशा पाटनी याआधीही अनेक प्रसिद्ध स्टार्ससोबत अशा घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये सेलिब्रिटींसोबत गोळीबार झाल्याचे प्रकरण घडले आहे.
शुक्रवारी सकाळी बरेली येथील बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. पहाटे ४.३० च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दिशा पटानीच्या घरावर तीन ते चार राउंड गोळीबार केला.
१४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण बॉलिवूड हादरून गेले. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने या गोळीबार घटनेची जबाबदारी घेतली.
कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी कॅनडामध्ये एक कॅफे उघडला. उघडल्यानंतर काही दिवसांतच या कॅफेवर हल्ला झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर, काही दिवसांनी पुन्हा कपिलच्या कॅफेवर गोळीबार झाला.
सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लन यांच्या कॅनडामधील घराबाहेर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित रोहित गोदाराने या घटनेची जबाबदारी घेतली.
गोविंदा त्याची परवानाधारक रिव्हॉल्व्हर साफ करत होता, रिव्हॉल्व्हर केसमध्ये ठेवत असताना त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर निसटली आणि गोळी पायाला लागली.
१७ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता गुरुग्राममधील यूट्यूबर एल्विश यादवच्या घरी गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी सुमारे १२ राउंड गोळीबार करत सुमारे २४-२५ गोळ्या झाडल्या.