Rupali Bhosale : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गाडीचा भयंकर अपघात, नव्या कोऱ्या कारची झाली वाईट अवस्था

Rupali Bhosale New Car Accident : मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या नवीन गाडीचा अपघात झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने याची माहिती दिली आहे.
Rupali Bhosale New Car Accident
Rupali BhosaleSAAM TV
Published On
Summary

रुपाली भोसलेच्या नवीन कारचा अपघात झाला आहे.

रुपाली भोसले सध्या 'लपंडाव' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रुपालीने इन्स्टाग्रामवर स्टोरीला गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'लपंडाव' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात आता रुपाली भोसलेच्या नवीन गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुपालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात गाडीची वाईट अवस्था पाहायला मिळत आहे.

रुपाली भोसले इन्स्टाग्रामच्या स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात गाडीचा अपघात झाल्याचे दिसत आहे. तिने व्हिडीओवर "अपघात झाला, वाईट दिवस" असे कॅप्शन लिहिलं आहे. तसेच हार्ट ब्रेकचा इमोजी टाकला आहे. रुपालीने अलिकडेच नवी कोरी मर्सिडीज खरेदी केली होती. गाडीच्या बोनटचे मोठे नुकसान झाले आहे. रुपाली भोसले अपघात विषयी काही सविस्तर माहिती शेअर केली नाही. मात्र गाडी महाग असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

नवीन मालिका

रुपाली भोसले सध्या 'लपंडाव' या मालिकेत झळकत आहे. ही मालिका 15 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही नवी मालिका सोमवार-शनिवार दुपारी 2:00 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येते.

Rupali Bhosle
Rupali Bhosleinstagram

वर्कफ्रंट

रुपाली भोसलेने 'आई कुठे काय करते' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. तिचे संजना हे पात्र खूप गाजले होते. तसेच रुपाली भोसले 'बिग बॉस मराठी 2' मध्ये झळकली होती. बिग बॉसच्या घरातील तिचा गेम प्रेक्षकांना खूप आवडला. 'बिग बॉस' नंतर रुपालीला अनेक प्रोजेक्ट मिळत गेले. जे तिने यशस्वीपणे पूर्ण केले. मराठी टिव्ही इंडस्ट्रील रुपाली भोसले हे मोठे नाव आहे.

Rupali Bhosale New Car Accident
IND vs PaK, Asia Cup 2025 : "सामना कोई भी हो, भारत तिलक लगाकर ही घर भेजेगा", भारताच्या विजयानंतर बॉलिवूडमध्ये जल्लोष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com