Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप

Lapandav Marathi Serial: स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका ‘लपंडाव’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची झलक सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आली आहे.
Lapandav Marathi Serial
Lapandav Marathi SerialSaam Tv
Published On

Lapandav Marathi Serial: स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका ‘लपंडाव’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तिचा पहिला भाग १५ सप्टेंबरपासून प्रसारित होणार आहे. ही मालिका सध्या चर्चेत आहे कारण तिच्या कथानकात कौटुंबिक नाती, त्यातील प्रेम, गैरसमज, मतभेद आणि त्यातून उभे राहणारे भावनिक चढउतार यांचा सुंदर संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

या मालिकेत रूपाली भोसले, चेतन वडनेर आणि कृतिका देव हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रूपाली भोसले यामध्ये एका ठाम, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्तेपणा असलेल्या भूमिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत एका जबाबदार, संवेदनशील आणि स्वतःच्या विचारांवर ठाम असलेल्या स्त्रीची भूमिका साकारणार आहेत. चेतन वडनेर याची व्यक्तिरेखा कथानकात रोमांचक वळणे आणेल, तर कृतिका देव यांच्या भूमिकेत गोडवा, निरागसता आणि नात्यांबद्दलची जिव्हाळा दिसून येणार आहे.

Lapandav Marathi Serial
Nikhil Bane: हास्यजत्रेच्या निखिल बनेने जिंकली प्रेक्षकांची मने; कोकणात जाऊन केली भातलावणी, अनुभव सांगताना म्हणाला...

लपंडाव’ ही केवळ प्रेमकथा नसून, नात्यांमधील सत्य-असत्य, मनातील खेळ, गुपिते आणि एकमेकांवरील विश्वास यांची कसोटी घेणारी कथा आहे. नात्यांमध्ये कधी गोड क्षण येतात, तर कधी गैरसमज निर्माण होतात; हे सर्व एका ‘लपंडाव’च्या खेळासारखे अनपेक्षितपणे घडते, हे या मालिकेच्या शीर्षकातूनच सूचित होते.

Lapandav Marathi Serial
Box office collection: 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी 'सैयारा'ला टाकलं मागे; जाणून घ्या 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २'ची कमाई

याच सह ‘शुभविवाह’ ही मालिका अडीच वर्षांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आकाश-भूमीची ही मालिकेचा निरोप होऊन लपंडाव ही मालिके प्रेक्षकांच्या भेटीला येईल हे पाहणे उत्सुकाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com