Pranit More : 'महाराष्ट्रीयन भाऊ'ची 'Bigg Boss 19'च्या घरात धमाकेदार एन्ट्री, कोण आहे प्रणित मोरे?

Who Is Pranit More : मराठी स्टँडअप कॉमेडियनची 'बिग बॉस 19'मध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे. प्रणित मोरे नेमका कोण, जाणून घेऊयात.
Who Is Pranit More
Pranit MoreSAAM TV
Published On
Summary

सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो सुरू झाला आहे.

'बिग बॉस 19'मध्ये प्रणित मोरेची एन्ट्री झाली आहे.

प्रणित मोरेला 'महाराष्ट्रीयन भाऊ' म्हणून ओळखतात.

सलमान खानच्या 'बिग बॉस 19' ची (Bigg Boss 19) सुरुवात काल (24 ऑगस्ट)पासून झाली आहे. प्रेक्षक शोची उत्सुकतेने वाट पाहत होते. ग्रँड प्रिमियर सोहळा धमाकेदार अंदाजात पार पडला. 'बिग बॉस 19'मध्ये 16 सेलिब्रिटी झळकले आहे. शोमध्ये एका मराठमोळ्या कलाकाराची एन्ट्री देखील झाली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो कलाकार दुसरा-तिसरा कोणी नसून मराठी कॉमेडियन प्रणित मोरे आहे.

प्रणित मोरेला (Pranit More ) 'महाराष्ट्रीयन भाऊ' म्हणून ओळखतात. तो स्टँडअप कॉमेडीचा राजा आहे. त्याचे कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. प्रणित मोरेच्या 'बिग बॉस 19' मधील एन्ट्रीने चाहते खूप झाले आहेत. 'बिग बॉस' मंचावर पोहचताच प्रणित मोरेने आपला मराठी स्वॅग दाखवला आहे. तसेच सलमान खानसोबत मराठीत संवाद साधला आहे.

सलमानला मराठीत बोलायला लावले

'बिग बॉस 19'च्या स्टेजवर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेची धमाकेदार एन्ट्री झाली. 'बिग बॉस 19'च्या स्टेजवरूनही प्रणितने प्रेक्षकांना हसवले आहे. शोमध्ये प्रणित मोरे आणि सलमान खानने मराठीत संवाद साधला. सलमान म्हणाला की, "मला वाटलेच होते की तू माझ्यावर येणारच...तेव्हा प्रणित उत्तर देत म्हणतो की, तुमच्यावर नाही येणार, नाहीतर मी उडेल..." प्रणित मोरेने सलमानसोबत सर्वांनाच खळखळून हसवले आहे.

कोण आहे प्रणित मोरे?

प्रणित मोरेची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्याला स्टँडअप कॉमेडीमुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. तसेच गेल्या काही काळात तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. प्रणित मोरेचे स्वतःचे युट्यूब चॅनेल देखील आहे. प्रणित बॉलिवूड सेलिब्रिटींवर विनोद करतो. त्याची विनोद शैली प्रेक्षकांना खूप आवडते. वीर पहारियावर विनोद केल्याने प्रणित मोरेला मारहाण करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात वीरने सांगितले की त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. त्यानंतर प्रणितने देखील वीर पहारियाची माफी मागितली. प्रणित मोरे स्टँडअप कॉमेडी करण्याआधी रेडिओ जॉकी म्हणून काम करत होता.

आता बिग बॉसच्या घरात प्रणित मोरे कसा राडा घालतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळणार आहे.

Who Is Pranit More
Bigg Boss 19 : प्रणित मोरे ते गौरव खन्ना; कोण-कोण आहे 'बिग बॉस 19'मध्ये? वाचा सविस्तर यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com