Pranit More: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई, ११ जणांविरोधात गुन्हा

Stand-up Comedian Pranit More: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापूरात मारहाण करण्यात आली होती. अभिनेता वीर पहारियाबाबत प्रणितने विनोद केला होता. त्यावरून वीरच्या चाहत्यांनी त्याला मारहाण केली होती.
Pranit More: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई, ११ जणांविरोधात गुन्हा
Pranit More Saam Tv
Published On

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरात स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेचा सोलापूर पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलिस ठाण्यामध्ये तन्वीर शेख आणि अन्य १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्या १० जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५, १९१, १८९ आणि १९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. 'स्काय फोर्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहारिया या अभिनेत्यावर प्रणित मोरेने विनोद केला होता. त्यावरून त्याला मारहाण करण्यात आली होती.

Pranit More: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई, ११ जणांविरोधात गुन्हा
Solapur Corporation : महापालिकेचा अजब कारभार; सोलापूर विकास आराखड्यात साताऱ्याच्या जलमंदिराचा समावेश

वीर पहारिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. प्रणित मोरेने वीर पहारियावर सोलापूरमधील एका स्टॅडअप कॉमेडी शोदरम्यान विनोद केल्यामुळे संतप्त झालेल्या वीरच्या चाहत्यांनी त्याला मारहाण केली होती. वीर पहारियाला ही घटना समजताच त्याने तात्काळ इन्स्टाग्राम पोस्ट लिहून खंत व्यक्त केली होती.

Pranit More: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई, ११ जणांविरोधात गुन्हा
Pranit More: दुसऱ्याची टर खेचणाऱ्या प्रणित मोरेचे शिक्षण किती?

प्रणित मोरेला मारहाण केल्यानंतर वीर पहारियाने केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'मी अत्यंत दु:खी आहे. घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. मी कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करत नाही. ही घटना माझ्या विचारसरणीच्या विरूद्ध आहे आणि मी या प्रकरणाच्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. हा हल्ला ज्यांनी केला त्याला शिक्षा व्हावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल.'

Pranit More: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई, ११ जणांविरोधात गुन्हा
Veer Pahariya: मी ट्रोलिंगला नेहमीच हलक्यात.. सोलापूरात प्रणित मोरेवर हल्ला, वीर पहारियानं दिली पहिली प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com