Shreya Maskar
'बिग बॉस 14' ची स्पर्धक पवित्रा पुनिया हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. पवित्रा यापूर्वी बिग बॉसचा सदस्य एजाज खानला (Eijaz Khan) डेट करत होती. मात्र त्यांचा काही काळानंतर ब्रेकअप झाला.
'बिग बॉस'नंतरही बराच काळ पवित्रा आणि एजाज खान एकत्र होते. अनेक पार्टीमध्ये एकत्र स्पॉट व्हायचे. मात्र कालांतराने ही जोडी वेगळी झाली.
पवित्रा पुनियाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ये है मोहब्बतें, गीत - हुई सबसे पराई, नागिन या तिच्या मालिका गाजल्या आहेत.
पवित्रा पुनियाने नुकतेच आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे. या फोटोत पवित्राने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा लपवला आहे. समुद्रकिनारी पवित्राचा नवरा तिला प्रपोज करताना दिसत आहे.
"लॉक इन... प्रेमानं हे ऑफिशल केलंय... पवित्रा पुनिया लवकरच मिसेस होणार..." असे हटके कॅप्शन तिने फोटोंना दिले आहे. तसेच पुढे #NS असा एक हॅशटॅगही लिहिला आहे.
पवित्रा पुनियाने आपल्या प्रेमाची सोशल मीडियावर कबुली दिल्यानंतर चाहते, कलाकार मंडळी या दोघांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत.
पवित्रा पुनियाचा होणार नवरा एक बिझनेस मॅन आहे. चाहते आता पवित्रा पुनिया होणार नवरा नेमका कोण आहे, कसा दिसतो हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
पवित्राने शेअर केलेल्या फोटोत तिचा प्रियकर गुडघ्यावर बसून अंगठी घालताना दिसत आहे. तसेच दोघे एकमेकांना मिठी मारत आहेत. दोघे एकत्र खूपच क्यूट दिसत आहे.