Shreya Maskar
रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना या जोडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यांचा 'थामा' चित्रपट 21 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'थामा' हा हॉरर-कॉमेडी- लव्ह स्टोरी चित्रपट आहे. 'थामा' चित्रपटातून पहिल्यांदाच रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'थामा' चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
'थामा' चित्रपटात रश्मिका, आयुष्मानसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी, सप्तमी गौड़ा, डायना पेंटी, वरुण धवन, संजय दत्त, अपारशक्ती खुराणा असे अनेक कलाकार आहेत.
'थामा' चे 'तुम मेरे न हुए' हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील रश्मिका आणि आयुष्मानची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.
'थामा' ने पहिल्या दिवशी सैयाराचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाच्या 'थामा' चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 24 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
थिएटर गाजवल्यानंतर 'थामा' चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'थामा' चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
मात्र अद्याप ओटीटी रिलीजची डेट जाहीर करण्यात आली नसून रिपोर्टनुसार, चित्रपट थिएटर रिलीजनंतर सहा ते आठ आठवड्यांच्या आत ओटीटीवर येईल. म्हणजेच डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या आसपास चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळेल.