Shreya Maskar
आज (22 ऑक्टोबर ) बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा वाढदिवस आहे. आज परिणीती 37 वर्षांची झाली आहे.
परिणीती चोप्राला बॉलिवूडची 'परी' म्हणून ओळखले जाते. परिणीती एक उत्तम अभिनेत्रीसोबत गायिका देखील आहे. तिने आजवर अनेक गाणी देखील गायली आहे.
2011 मध्ये रिलीज झालेल्या 'लेडीज वर्सेस रिकी बहल'मधून परिणीती चोप्राने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'इशकजादे' चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत दिसली.
परिणीती चोप्राने 2023 मध्ये राजकारणी राघव चड्ढासोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी परिणीतीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
परिणीती चोप्रा एका चित्रपटासाठी जवळपास 5-12 कोटी मानधन घेते. तर एका जाहिरातीसाठी लाख ते 5-10 कोटींमध्ये फी घेते.
परिणीती चोप्राचे मुंबईत वांद्रे येथे जवळपास 22 कोटी रुपयांचा आलिशान अपार्टमेंट आहे. तर दिल्लीतही तिचे घर आहे.
परिणीती चोप्राकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. ज्यात रेंज रोव्हर, ऑडी, जॅग्वार, लँड रोव्हर यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती चोप्राची एकूण संपत्ती अंदाजे ₹74 कोटी आहे.