Shreya Maskar
दिवाळी स्पेशल साऊथ सुपरस्टार नॅशनल रश्मिका मंदान्नाने पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट केले आहे. रश्मिका मंदान्ना नॅशनल क्रश आहे.
रश्मिकाने ऑफ व्हाइट रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. त्यावर हिरव्या रंगाचा सुंदर नक्षीकाम असलेला दुपट्टा घेतला आहे.
ड्रेसला मॅचिंग ज्वेलरी, कपाळावर बिंदी आणि मिनिमल मेकअप करून तिने लूक पूर्ण केला आहे. मोकळ्या केसांमध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसत आहे.
रश्मिका मंदान्नाने फोटोंना खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "दिवाळीच्या शुभेच्छा...तुम्हा सर्वांना खूप प्रेम..." रश्मिका मंदान्नाची क्यूट स्माइल आणि कातिल अदा पाहून चाहते वेडे झाले आहेत.
रश्मिकाच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. "पारंपरिक ड्रेस मे क्या ही लूक आता है", "ओ मेरी जान", "फटाका", "तू किती सुंदर दिसतेस", "सुंदर नजारा", "कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है" अशा कमेंट्स येत आहे.
रश्मिका मंदान्नाचा 'थामा' चित्रपट 21 ऑक्टोबर 2025 ला म्हणजे आज थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आयुष्मान खुरानासोबत झळकले आहेत.
'थामा' चित्रपटात रश्मिका-आयुष्मानसोबतच सप्तमी गौड़ा, वरुण धवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, संजय दत्त, परेश रावल, अपारशक्ती खुराणा असे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत.
'थामा' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आहेत. 'थामा' ही एक प्रेमकथा आहे. 'थामा' चित्रपटाच्या माध्यमातून रश्मिका आणि आयुष्मान पहिल्यांदा एकत्र झळकले आहेत.