Shreya Maskar
महाराष्ट्राची 'चंद्रा' अमृता खानविलकरने यंदा आपल्या नवीन घरात दिवाळी साजरी केली आहे. ज्याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अमृता खानविलकरने पांढऱ्या रंगाचा पंजाबी स्टाइल ड्रेस परिधान केला होता. ज्यावर गोल्डन रंगाची सुंदर डिझाइन पाहायला मिळाली.
ड्रेसला मॅचिंग ज्वेलरी, केसांची सुंदर हेअर स्टाइल, मिनिमल मेकअप आणि कपाळावर बंदी लावून तिने हा लूक पूर्ण केला.
अमृता खानविलकरने घरी कंदीलसोबत फोटो क्लिक केले आहे. तसेच मिरर सेल्फीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. घरात रोषणाई पाहायला मिळत आहे.
अमृताने फोटो शेअर करून 'माझा सर्वात आवडता सण' असे कॅप्शन फोटोंना दिले आहे. तिच्या या फोटोंवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
"सुंदर", "खुप छान दिसते", "दिवाळीचा सुंदर, अप्रदूषित, निर्मळ फटाका", "दिवाळीच्या शुभेच्छा" अशा कमेंट्स अमृता खानविलकरच्या फोटोंना येत आहेत.
अमृताच्या नवीन घराचे नाव 'एकम' (EKAM) असे आहे. 2024 मध्ये तिने खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करून आपल्या नवीन घराची झलक दाखवली होती.
अमृता खानविलकरला 'चंद्रा' चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.