Shreya Maskar
साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना तिचा आगामी चित्रपट 'थामा'मुळे चांगली चर्चेत आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना एका खास अंदाजात पाहायला मिळणार आहे.
रश्मिकाने इन्स्टाग्रामवर सुंदर मरून कलरच्या सूटमधील फोटो शेअर केले आहेत. यात लाल आणि गोल्डन रंगाच्या छटा पाहायला मिळत आहेत.
लूकला मॅचिंग ज्वेलरी तिने परिधान केली आहे. तसेच ग्लॉसी मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत. तिचा चेहरा ग्लो करताना दिसत आहे.
फोटोंमध्ये रश्मिका वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा आहे. ते कमेंटमध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
"Hey क्रश", "क्युट स्माइल", "लव्ह यू रश्मिका", "खूप सुंदर" अशा कमेंट्स येत आहेत. तसेच चाहते तिला दिवाळीच्या शुभेच्छां देखील देत आहेत.
'थामा' चित्रपट 21 ऑक्टोबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आयुष्मान खुरानासोबत झळकणार आहे.
'थामा' चित्रपटात रश्मिका-आयुष्मानसोबतच सप्तमी गौड़ा, वरुण धवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, संजय दत्त, परेश रावल, अपारशक्ती खुराणा असे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत.
'थामा' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आहेत. 'थामा' ही एक प्रेमकथा आहे. प्रेक्षक चित्रपटासाठी उत्सुक आहेत.