Ankita- Vicky Fighting Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita- Vicky Fighting: ‘तुझ्यासोबत लग्न केलं अन् माझं नशीब...’; बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता-विकीमध्ये पुन्हा जुंपली

Bigg Boss 17 Latest News: कायमच वादाच्या अग्रस्थानी राहणारी अंकिता- विकीची जोडी गेल्या अनेक दिवसांपासून सध्या त्यांच्या वादामुळेही आणि नात्यामुळे चर्चेत आले.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Latest Promo

बिग बॉस म्हटलं की, वाद, तंटा आणि आपआपसातील हमरी तुमरी आलीच. बिग बॉसच्या घरामध्ये वाद काही नवीन नाही. सध्या प्रेक्षकांच्या भेटीला ‘बिग बॉस १७’ आलं आहे. हा शो सुरु होऊन आता जवळपास महिना होईल. यंदाच्या शोमध्ये, काही कपल्सनेही एकत्रित घरामध्ये एन्ट्री घेतली.

कायमच वादाच्या अग्रस्थानी राहणारी अंकिता- विकीची जोडी गेल्या अनेक दिवसांपासून सध्या त्यांच्या वादामुळेही आणि नात्यामुळे चर्चेत आले. पहिल्याच दिवसापासून या जोडीमध्ये जोरदार भांडण होताना पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओमध्ये दोघांचेही जोरदार भांडण होताना दिसत आहे.

नुकतंच विकेंड का वार पार पडला, यावेळी सलमानने मन्नारा आणि खानजादीला चांगलंच सुनावलं आहे. यावेळी त्याने कपलचीही चांगलीच कानउघडणी केली आहे. नुकतंच सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दोघांचाही वाद नेहमीप्रमाणे चांगलाच विकोपाला गेलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता विकीसोबत गैरवर्तन करताना दिसतेय. या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, विकी पत्नी अंकितासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. त्याने गैरवर्तन केल्यामुळे विकीला सलमान खानने चांगलेच झापले आहे.

विकी जैन आतापर्यंत ‘दिल का घर’मध्ये होता. नुकतंच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये त्याला दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे, असं दिसतंय. सोमवारच्या एपिसोडमध्ये विकीला ‘दिमाग का घर’मध्ये टाकलेले दिसत आहे. त्याला दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट केल्यामुळे आणि आता पती आपल्यासोबत राहणार नसल्यामुळे अंकिता खूपच नाराज दिसतेय. जरीही असं असलं तरीही तो ‘दिमाग का घर’मध्ये त्याच्या स्पर्धक मित्रांसोबत धम्माल मस्ती करताना दिसत आहे. (Serial)

अंकिता नाराज असल्यामुळे तिच्यासोबत बिग बॉसने संवाद साधला. यावेळी तिला बिग बॉस म्हणाले की, ‘तू ज्या व्यक्तीसाठी नाराज होत आहे, ती व्यक्ती तिकडे नाचतोय.’ हे ऐकून अंकिताच्या रागाचा प्रचंड पारा वाढला. नंतर अंकिताला विकी समजवायला आला होता. त्यावेळी ती प्रचंड चिडलेली होती. “मला काही माहित नाही, नाहीतर मी तुला लाथ मारेल. तु खरंच खुप स्वार्थी आणि मूर्ख माणूस आहेस. मी तुझ्यासोबत लग्न केलं, राहिले म्हणून माझं नशीब खराब झालं. तू आता विसरुन जा आपलं लग्न झालं होतं. आजपासून आपण दोघेही वेगवेगळे झालोय. तू फक्त माझा वापर केला आहेस. तू माझ्यासोबत बोलू नकोस, असं बोलत ती त्याला तिथून जायला सांगते.” असं अंकिता विकीला म्हणाली. (Social Media)

नुकत्याच झालेल्या ‘विकेंड का वार’ मध्ये सलमानने विकी- अंकिताला त्यांच्यातले सुधारण्याचा महत्वाचा सल्ला दिला होता. असा वाद विकोपाला जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी अनेकदा त्यांच्यामध्ये वादाचे खटके उडाले आहेत. आता अंकिता आणि विकीतला वाद आणखी किती विकेपाला जातो, हे पाहणे महत्वाचे आहे. या भांडणानंतर यांच्यातील नात्यामध्ये काय परिणाम होणार?, हे आजच्या भागातच कळेल. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT