Mumbai Police: पोलीस शिपायाकडून महिला शिपाईशी गैरवर्तन; मानसिक त्रास देत बदनामीची दिली धमकी

Mumbai Police Crime News: पोलीस शिपाईकडून महिला शिपाईशी गैरवर्तन केल्याचा धक्कादयक प्रकार समोर आला आहे.
Mumbai Police
Mumbai PoliceSaam TV
Published On

Mumbai Police:

मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपाईकडून महिला शिपाईशी गैरवर्तन केल्याचा धक्कादयक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी उत्तम (वय ३५) याच्या विरोधात कलम ३५४,३५४ (आय), ३५४(क),५०९,५०४,५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Police
Crime News : सणासुदीच्या काळात युवकांचा भाेसकून खून, नांदेडसह तळेगाव पाेलीसांचा तपास सुरु

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई यांना आरोपी वारंवार मानसीक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. आरोपी इतक्यावरच न थांबता त्याने महिलेला तिच्या पतीला बदनाम करण्याची तसेच शिवीगाळ करून नोकरी घालवण्याची धमकी दिली, असंही महिलेने तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी अॅन्टॉप हिल पोलीस अधिक तपास करत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या नावाने इंजिनिअर महिलेची फसवणूक

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या नावाने इंजिनिअर महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अनोळखी आरोपीने पीडित महिलेच्या फोनवर फोन करत आपण NCB तून बोलत असल्याचे सांगितले.

त्यानंतर आरोपीने महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक बड्या अधिकार्यांची नावे घेत महिलेकडून ५ लाख ८५ हजार रुपय उकळले. दरम्यान, आरोपीने फसवणूक केल्याचे समोर आल्यनंतर महिलने अनोळखी आरोपी विरोधात वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वनराई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai Police
Yavatmal Crime News : चाकूने भोकसून उमरखेड येथे युवकाचा खून, दाेघे पाेलीसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com