Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

brother in law attacks sister in law with sickle: पुण्यामध्ये जागेच्या वादावरून दिराने भावजयीवर जीवघेणा हल्ला केला. कोयत्यानाे सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. आरोपीला पोलिसांनी अटक केली.
Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार
pune crimeSaam tv
Published On

Summary:

  • पुणे जिल्ह्यात जमिनीच्या वादातून कोयत्याने हल्ला

  • आंबेगाव तालुक्यात दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला

  • कौटुंबिक वादातून घडली घटना

  • हल्ल्यात महिला गंभीर जखमी

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला

जमिनीच्या वादातून दिराने भावजयीवर जीवघेणा हल्ला केला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये ही घटना घडली. जागेवरून झालेल्या कौटुंबिक वादातून ही घटना घडली. वाद इतका विकोपाला गेला की संतप्त झालेल्या दिराने भावजयीवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात घराच्या जागेच्या वादातून संतापजनक घटना घडली. कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वयस्कर सख्ख्या भावजयीवर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार
Crime: १७ वर्षीय मुलाकडून ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेल; १ पीडिता गरोदर

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरेश धोंडीबा सोनवणे असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. पारगाव कारखाना पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार
Pune Crime : पुण्यातील तरुणाच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; मैत्रिणीनं नेमका काय मेसेज केला होता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com