Juhi Chawla Net Worth: ३ वर्षांमध्ये २९ चित्रपट देणारी जुही चावला सध्या काय करते?; आहे इतक्या कोटींची मालकीण...

Juhi Chawla Birthday: नव्वदच्या दशकामध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री जुही चावलाचा आज ५५वा वाढदिवस आहे.
Juhi Chawla Net Worth
Juhi Chawla Net WorthSaam Tv

Juhi Chawla Net Worth

नव्वदच्या दशकामध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री जुही चावलाचा (Juhi Chawla) आज ५५वा वाढदिवस आहे. तिने जवळपास तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये काम केलंय. (Juhi Chawla Birthday) आपल्या सदाबहार सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या जुहीने खासगी आयुष्यात बरेच चढ उतार पाहिलेय. ‘सल्तनत’ (Sultanat) मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या एकूण संपत्तीबद्दल...

Juhi Chawla Net Worth
Malegaon Tiger 3: मालेगावात सलमान खानच्या चाहत्यांची हुल्लडबाजी, 'टायगर ३' बघताना थिएटरमध्ये फोडले फटाके

जुही चावलाने आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये जवळपास ८६ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर, फिल्म प्रोड्यूसर सुद्धा आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, जुहीची संपत्ती जवळपास ६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४८ कोटी रुपये इतकी आहे. जुही चावला सध्या मुंबईतील मलबार हिल या परिसरामध्ये पती जय मेहता आणि दोन मुलांसोबत एक आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

गेल्या अनेक वर्षांपासून जुही चावला अभिनयापासून दुर आहे. जुही चावला अभिनयातून, जाहिरातीतून आणि तिच्या व्यवसायातूनही चांगलीच कमाई करते. जुही एका प्रोजेक्टसाठी कोट्यवधींचे मानधन आकारते. जुही चावलाने १९९५ मध्ये व्यावसायिक जय मेहतासोबत लग्नगाठ बांधली आहे.

जय मेहता जवळपास ३५० मिलियन डॉलर इतक्या संपत्तीचे मालक असून जुही चावलाही ७० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

Juhi Chawla Net Worth
Salaar Poster: प्रभासचा ‘सालार’मधला ॲक्शन लूक पाहिलात का?, दिवाळीच्या मुहूर्तावर जाहीर केली ट्रेलर रिलीज डेट

जुही चावलाला महागड्या कारचीही प्रचंड आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये १.११ कोटी किमतीच्या Jaguar XLJ आणि ७८ लाख किंमतीच्या Audi Q7 (Audi Q7) सारख्या आलिशान कारचा समावेश आहे. मुख्य बाब म्हणजे आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या क्रिकेट टीमची ती सहमालकिण सुद्धा आहे. या टीमचा मुख्य मालक बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आहे. या दोघांच्याही मालकीची ही टीम आहे. (Actress)

जुही चावलाने आपल्या सिनेकारकिर्दिमध्ये, जवळपास ८६ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती कायमच आपल्या अनेक सिनेमांमुळे चर्चेत राहिली आहे. तिने ८० आणि ९० च्य दशकामध्ये अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. जुही २०२३ मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या 'फ्रायडे नाईट प्लॅन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. (Entertainment News)

Juhi Chawla Net Worth
Tiger 3 Box Office Collection Day 1: बॉक्स ऑफिसवर फुटला 'टायगर ३'चा बॉम्ब, पहिल्याच दिवशी इतकी कमाई करत केला रेकॉर्ड सेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com