कायमच आपल्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत राहणारी मानसी नाईक सध्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. मानसी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा आपल्या फॅशनमुळे तर कधीकधी आपल्या रिल्समुळे सुद्धा ती चर्चेत असते. मानसी अनेक दिवसांनंतर एका नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच मानसीची ‘लावा फोन चार्जिंगला’ ही ठसकेबाज लावणी सोशल मीडियावर रिलीज झाली आहे.
मानसी नाईक नेहमीच आपल्या ठसकेबाज लावणीमुळे आणि हटक्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहते. सध्या मानसी नाईक ‘लावा फोन चार्जिंगला’ या लावणीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे. तिच्या ह्या नखरेल लावणीला गायिका प्रियांका चौधरीचा जबरदस्त आवाज लाभला आहे. तर महाराष्ट्राची लाडकी मेनका आणि अभिनेत्री मानसी नाईकच्या नृत्य आणि नखरेल अदाकारीने लावणीला चारचांद लावले आहेत. गाण्याचे दिग्दर्शन व नृत्य दिग्दर्शन 'सुंदरीकार' आशिष पाटील यांचे असून 'रॉकस्टार' अवधूत गुप्तेंचे शब्द आणि स्वररचना आहे. या सर्वांच्या कलेने ही 'लावण्यवती' बहरली आहे.
एकविरा म्युझिक प्रस्तुत 'लावण्यवती' या अल्बममधील 'गणराया' आणि 'करा ऊस मोठा' या दोन गाण्यांनंतर आता 'लावा फोन चार्जिंगला' ही ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गाण्याबद्दल दिग्दर्शक अवधूत गुप्तेने सांगितले की, “ ‘लावण्यवती’तील पहिल्या दोन लावण्या संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरल्या. आता ही तिसरी बहारदार लावणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मानसी नाईकने आपल्या नजाकतीने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. आता या लावणीने तिच्या चाहत्यांमध्ये अधिकच भर पडणार आहे. खूप धमाकेदार अशी ही लावणी आहे.” (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.