Kaun Banega Crorepati season 17: 'कौन बनेगा करोडपती'चा नवीन सीझन सुरू होणार आहे आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा होस्टच्या खुर्चीवर बसणार आहेत. जर तुम्हाला यासाठी स्वतःची नोंदणी करायची असेल तर खाली दिलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
प्रसिद्ध क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) लवकरच आपल्या १७व्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. शोच्या प्रसारण तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, रजिस्ट्रेशन प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
सोनी टेलिव्हिजनने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करत, "तयार व्हा १४ एप्रिलपासून हॉट सीटवर येण्यासाठी. केबीसीचे रजिस्ट्रेशन्स आणि आमच्या एबीचे प्रश्न सुरू होणार आहेत," असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे. याचा अर्थ, 'केबीसी १७' साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया १४ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. 'केबीसी १७' साठी अर्ज करण्यासाठी, इच्छुकांना अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. मागील सीझनप्रमाणे, यावेळीही SonyLiv अॅप, एसएमएस, किंवा IVR कॉलद्वारे रजिस्ट्रेशन करता येईल.
'कौन बनेगा करोडपती' हा शो आपल्या ज्ञानाच्या आधारे मोठी रक्कम जिंकण्याची संधी देतो. अमिताभ बच्चन यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे हा शो प्रेक्षकांच्या आवडीचा ठरला आहे. नवीन सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घ्यावा.
केबीसी १७ कधी येईल?
केबीसी १६ नुकताच संपला आहे आणि आता केबीसी १७ साठी नोंदणी सुरू होणार आहे. याचा अर्थ असा की या शोचा पुढचा सीझन लवकरच येत आहे. तथापि, त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे, बिग बींचा हा लोकप्रिय शो कधी येईल याची वाट तुम्हाला पाहावी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.