Neena Gupta
Neena GuptaSaam Tv

Neena Gupta: 'केवळ पुरुषांना आनंद देण्यासाठी...'; नीना गुप्ता शारिरीक संबंधांवर स्पष्टच म्हणाल्या

Neena Gupta: अभिनेत्री नीना गुप्ता यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शारिरीक संबंधांबद्दल त्यांचे स्पष्ट मत मांडले आहे. तसेच भारतीय महिलांच्या विचारसरणीबद्दलही मत व्यक्त केले.
Published on

Neena Gupta: प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी शारिरीक संबंधबद्दल आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या मते, 'शारिरीक संबंध हा अतिशय जास्त महत्त्व दिलेला विषय आहे, आणि भारतातील ९५ टक्के महिलांना हे माहितच नाही की सेक्स आनंदासाठी असतो.'

लिली सिंगसोबतच्या या विशेष मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, 'पूर्वी मी 'सेक्स' हा शब्द कुजबुजत उच्चारायचे, पण आता तसे नाही. मला वाटते की या विषयाला खूपच जास्त महत्त्व दिले आहे, आणि महिलांच्या बाबतीत मला वाईट वाटते.'

Neena Gupta
Idli Kadai : 'साऊथ नाही तर, संपूर्ण देश...'; धनुषच्या 'इडली कडाई' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित, तारीखही आली समोर

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या की, अनेक भारतीय महिलांना असे वाटते की शारिरीक संबंध हे केवळ पुरुषांना आनंद देण्यासाठी किंवा संततीसाठी असतात. त्यांच्या मते, "अधिकांश महिलांना हे माहितच नाही की शारिरीक संबंधाचा आनंद स्त्रीयांनाही मिळतो. त्यांना वाटते की ते पुरुषांना आनंदी ठेवण्यासाठी किंवा मुलं जन्माला घालण्यासाठी शारिरीक संबंध महत्वाचे असतात."

Neena Gupta
Sagar Karande: 'मी एकटाच सागर नव्हे...'; घरबसल्या पैसे कमावण्याच्या नादात गमावले ६१ लाख रुपये? अभिनेत्याने सांगितलं सत्य

या मुलाखतीदरम्यान, जेव्हा त्यांच्या वयाबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "मी माझं वय सांगणार नाही. कारण मी माझ्या वयापेक्षा खूपच तरुण दिसते.मला आधीच वयस्कर महिलेच्या भूमिका मिळतात. जर मी माझं वय सांगितलं, तर नंतर काय ऑफर केलं जाईल माहीत नाही. त्यामुळे व्यावसायिक कारणांसाठी मी वय उघड करणार नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com