Shruti Vilas Kadam
घरी चीज बनवण्यासाठी दूध, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर आणि स्वच्छ कापड लागते. हे साहित्य सहजपणे घरात उपलब्ध असतं.
एका भांड्यात दूध घालून मध्यम आचेवर उकळायला ठेवा. दूध पूर्णपणे उकळू लागल्यावर गॅस थोडा कमी करा.
उकळत्या दुधात थोडा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला आणि हलक्या हाताने हलवा. त्यामुळे दूध फाटून त्यातील पाणी आणि घट्ट भाग वेगळा होतो.
आता हे मिश्रण स्वच्छ कापडात गाळून घ्या. कापडात घट्ट भाग राहतो, तोच चीज किंवा पनीरसारखा भाग असतो.
कापडात राहिलेला घट्ट भाग थंड पाण्याने हलके धुवा. त्यामुळे लिंबाचा आंबटपणा कमी होतो.
कापड बांधून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका. काही वेळ वजन ठेवून ते घट्ट होऊ द्या.
थोड्या वेळाने कापड उघडल्यावर घरचं ताजं चीज तयार झालेलं असेल. हे चीज तुम्ही विविध रेसिपींमध्ये वापरू शकता.