Alia Bhatt  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : फोटोसाठी आलियाला ओढलं, हाताला झटका दिला; संतापजनक VIDEO समोर

Alia Bhatt Viral Video : आलिया भट्टचा दुर्गा पूजा दरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक चाहती तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी अभिनेत्रीला ओढताना दिसत आहे.

Shreya Maskar

आलिया भट्ट दूर्गा पूजा सोहळ्यात सहभागी झाली.

दुर्गा पूजा दरम्यान एक चाहती फोटोसाठी चक्क आलिया भट्टचा हात ओढताना दिसते.

आलिया भट्टच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) मोठा चाहता वर्ग आहे. तिला एक नजर पाहण्यासाठी, तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुखर्जी कुटुंबाकडून दुर्गा पूजा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी भेट दिली. देवीच्या दर्शनाला आलिया भट्ट देखील गेली होती. ज्याचे सोशल मीडियावर तुफान व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एका व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दर्शन घेऊन झाल्यावर आलिया भट्ट निघताना दिसत आहे. तिच्याभोवती चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. तेव्हा अचानक एक चाहती येते आणि आलिया भट्ट्च्या हाताला ओढून फोटोसाठी नेताना दिसत आहे. तेव्हा अचानक असे घडल्यामुळे काही सेकंदासाठी आलिया गोंधळते. मात्र नंतर ती हा क्षण शांतपणे हाताळताना दिसते. ती त्या महिलेसोबत सेल्फी देखील काढते. तसेच ती धक्का मारू नका अशी विनंती देखील करते.

आलियाचे अंगरक्षक जेव्हा त्या महिला चाहतीला मागे ढकलतात. तेव्हा आलिया त्यांना थांबवते. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या कृतीचे तसेच तिने हाताळलेल्या त्या क्षणाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तसेच त्या महिला चाहतीवर अनेक टिका होताना दिसत आहे. नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. कमेंट्स मध्ये असे म्हणतात की, "कलाकारही माणूस आहे..."

दिग्दर्शक अयान मुखर्जी आलियाला दुर्गा पूजा पंडालपर्यंत घेऊन येतो. तेथे राणी मुखर्जी आधीपासून असते. दोघी छान गप्पा मारतात. त्यानंतर आलिया देवीची मनोभावे पूजा करताना दिसते. आलियाने पूजेसाठी पारंपरिक लूक केला होता. तिने सुंदर साडी नेसली होती. तिच्या लूक चाहत्यांना खूपच आवडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT