Shreya Maskar
आज (28 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. रणबीर कपूर 43 वर्षांचा झाला आहे.
रणबीर-आलियाकडे लेक्सस एलएम, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, ऑडी, रेंज रोव्हर या लग्जरी कार आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नवीन बंगल्याचे नाव 'कृष्णा राज' असे आहे. हा बंगला मुंबई वांद्रे येथे आहे.
आलिया आणि रणबीरच्या नवीन लग्जरी घराची किंमत 250 कोटी रुपये आहे. लवकरच आलिया आणि रणबीर नवीन घरात शिफ्ट होणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूरची एकूण संपत्ती जवळपास 345 कोटींच्यावर आहे.
तर मीडिया रिपोर्टनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती अंदाजे 550 कोटींच्यावर आसपास आहे.
आलिया आणि रणबीरची एकूण संपत्ती सुमारे 895 कोटींच्यावर आहे.
2022 मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टने लग्नगाठ बांधली. त्यांना एक गोंडस मुलगी 'राहा' आहे.