Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नवरात्री स्पेशल सुंदर साडीत फोटोशूट केले आहे. तिने राखाडी रंगाची फ्लोरल प्रिंटेड साडी नेसली आहे.
स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये प्राजक्ताचे सौंदर्य खुलले आहे. साडीला मॅचिंग ज्वेलरी तिने परिधान केली आहे.
मोकळे केस आणि मिनिमल मेकअप करून प्राजक्ताने लूक पूर्ण केला आहे.
प्राजक्ताची कातिल नजर पाहून चाहते घायाळ झाले आहे. चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
"साडी नाही जणू चंद्रच पांघरलाय", "महाराष्ट्राची फुलवंती" अशा कमेंट्स प्राजक्ताच्या फोटोंना मिळत आहे.
प्राजक्ता माळी 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. यात ती ललित प्रभाकरसोबत झळकली होती.
सध्या प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोचे सूत्रसंचालक करत आहे.
प्राजक्ता माळी अभिनेत्रीसोबत बिझनेसवुमन, कवियत्री देखील आहे. प्राजक्ताच्या ज्वेलरी ब्रँडचे नाव प्राजक्तराज आहे.