Shreya Maskar
'थामा' च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला श्रद्धा कपूरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
श्रद्धा कपूरने सुंदर लाल रंगाची साडी नेसली होती. तिने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.
साडीवर गोल्डन रंगाचे नक्षीकाम पाहायला मिळत आहे. तसेच तिने साडीला मॅचिंग गोल्डन ज्वेलरी स्टाइल केली आहे.
केसांची लांब वेणी, मिनिमल मेकअपमध्ये श्रद्धाचे सौंदर्य खुललं आहे.
फोटोंमधील श्रद्धाची कातिल नजर पाहून चाहते घायाळ झाले आहेत. श्रद्धाचे या लूकमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
श्रद्धा कपूरने फोटोंना "आँखों में सपने...पेट में गुड गुड" असे हटके कॅप्शन दिले आहे.
"चाँद जमीन पर आ गया", "ब्युटिफूल स्त्री", "क्युट कपूर", "लाल परी" अशा कमेंट्स श्रद्धाच्या फोटोंवर चाहते करत आहेत.
श्रद्धा कपूर आतापर्यंत आशिकी २, स्त्री, छिछोरे, हाफ गर्लफ्रेंड, ABCD 2, तू झूठी मैं मक्कार, बागी ३, ओके जानू, एक विलन असे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे.