शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर 60 कोटी रुपयांच्या फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना परदेश दौऱ्याची परवानगी नाकारली आहे.
शिल्पा आणि राजने थायलंडमधील फुकेत येथे पिकनिकला जाण्याची परवानगी मागितली होती.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्यावर 60 कोटी रुपयांच्या फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2015- 2023 या काळात इन्व्हेस्टमेंट डील आणि कर्ज-सह-गुंतवणूकीच्या नावाखाली त्यांनी गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. मात्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना परदेश दौऱ्याची परवानगी नाकारली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी थायलंडमधील फुकेत येथे पिकनिकला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने ती नाकारली.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी परदेशात प्रवास करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या लूक आउट सर्क्युलरला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान पिकनिक प्लान केली होती. ज्यासाठी त्याने हॉटेलचे ॲडव्हान्स बुकिंग केले आहे. याची माहिती देखील त्यांनी उच्च न्यायालयात दाखवली. मात्र त्यांना परदेशात फिरण्याची परवानगी नाकारली. हायकोर्टच्या निर्णयामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा परदेशात सुट्टीवर एन्जॉय करायला जाऊ शकत नाही.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या 'सुपर डान्सर 5'चा जज आहे. शिल्पा आपल्या फिटनेस आणि डान्ससाठी ओळखली जाते. तिने आजवर अनेक सुपहिट चित्रपट दिले आहेत. चाहते तिच्या आगमी प्रोजेक्टची वाट पाहत आहे. शिल्पाच्या फिटनेस आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तिच्या लूकचे , व्यायामाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.