Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Zubeen Garg Death Case Update : गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. झुबीन गर्ग यांचे मॅनेजर आणि महोत्सवाच्या आयोजकांना अटक करण्यात आली आहे.
Zubeen Garg Death Case Update
Zubeen Garg Death CaseSAAM TV
Published On
Summary

झुबीन गर्ग यांचे 19 सप्टेंबरला निधन झाले.

झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांचे मॅनेजर आणि महोत्सवाच्या आयोजकाला अटक करण्यात आली आहे.

19 सप्टेंबर 2025 ला प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग (Zubeen Garg Death Case ) यांचे निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. अशात आता झुबीन गर्ग यांचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि सिंगापूर महोत्सवाचे आयोजक यांना दिल्ली येथे अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दोघांनाही गुवाहाटीला नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, झुबीन गर्ग यांचे व्यवस्थापक आणि महोत्सव आयोजक यांची चौकशी सुरू आहे.

महोत्सवाच्या आयोजकांना सिंगापूरहून नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच अटक करण्यात आली. तर मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांना गुरुग्राममधील एका अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली. पोलीसांनी आतापर्यंत अनेक लोकांचे जबाब नोंदवले आहेत.

Zubeen Garg Death Case Update
Avika Gor Wedding : 'बालिका वधू' फेम अविकानं थाटला संसार, लाईव्ह TV वर बांधली लग्नगाठ, पाहा video

झुबीन गर्ग

प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचा जन्म मेघालयामध्ये 1972 मध्ये झाला. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांचे खरे नाव जिबोन बोरठाकूर असे होते. 2006 साली रिलीज झालेल्या 'गँगस्टर' चित्रपटातील 'या अली' हे गाणे झुबीन गर्ग यांनी गायले. 'गँगस्टर' चित्रपटात इमरान हाश्मी आणि कंगना राणौत मुख्य भूमिकेत होते. झुबीन गर्ग यांनी आसामी, बंगाली, हिंदी अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

Zubeen Garg Death Case Update
Badshah : बादशाहने खरेदी केली कोट्यवधींची कार, किंमत वाचून घाम फुटेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com