
अमरेली विमानतळावर विमान लँडिंगदरम्यान रनवेवरून घसरल्याची घटना
पायलटने विमानावर वेळेवर नियंत्रण मिळवलं
या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
विमान दुर्घटना आणि रनववेरून घसरण्याच्या घटनांची मालिका सुरुच आहे. गुजरातच्या अमरेली विमानतळावर विमान लँडिंगदरम्यान रनवेवरून घसरल्याची घटना घडली आहे. विमान रनवेवरून घसरल्याने एकच खळबळ उडाली. पायलटने ऐनवेळी विमानावर नियंत्रण मिळावल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या अमरेलीत रविवारी दुपारी मोठी विमान दुर्घटना टळली. एक सिंगल सीटर विमान लँडिगदरम्यान रनवेवरून घसरलं. या घटनेत ट्रेनी पायलटला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, विमानाचा लँडिगदरम्यान तोल गेला होता. त्यामुळे विमान थेट रनवेच्या बाहेर गेले. विमान छोटं असून ते एका खासगी एविएशन अॅकडमीचं होतं.
अमरेलीचे जिल्हाधिकारी विकल्प भारद्वाज यांनी सांगितलं की, 'विमान रनवेवरून घसरलं. या विमानातील ट्रेनी पायलट सुरक्षित आहे. नागरी विमान वाहतूक अधिकारी या घटनेची चौकशी करणार आहे. या विमान रनवेवरून घसरताचा क्षण हा कॅमेऱ्यात कैद झाला आहे'.
या वर्षीच्या एप्रिल महिन्यात विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अमरेली शहराजवळ एका ट्रेनी पायलटचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. निवासी भागात कोसळलेल्या विमानातील ट्रेनी पायलटचा जागीच मृत्यू झाला होता. त्या घटनेचा तपास सध्या नागरी विमान वाहतूक विभाग तपास करत आहे. याचदरम्यान अमरेलीत ही घटना समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.