'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर लग्नबंधनात अडकली आहे.
अविका गौरने बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
अविका गौर आणि मिलिंद चंदवानी नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नबंधनात अडकले.
'बालिका वधू' या शो मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) नुकतीच लग्नबंधनात अडकली. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केले आहे. अविकाने तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अविका गौर आणि मिलिंद चंदवानी हे 'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. या शोच्या सेटवर काल (30 सप्टेंबर) ला विवाहबंधनात अडकले. अविका गौरने काही महिन्यांपूर्वी साखरपुडा केला होता. त्यांचे विधिवत लग्न झाले. या सोहळ्याला त्यांचे मित्रमंडळी, शोचे इतर कलाकार , तसेच दोघांचे कुटुंब आणि प्रेक्षक वर्ग सहभागी झाले.
दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत होते. अविका गौर लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. मॅचिंग ज्वेलरी आणि मेकअपमध्ये अविका खूपच सुंदर दिसत होती. तिने पांरपरिक लूक केला होता. नथ, कुंकू असा साज श्रृंगार केला होता. तर मिलिंद गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये हँडसम दिसत होता. ढोल ताशाच्या तालावर यांनी डान्स देखील केला.
2008 मध्ये सुरू झालेल्या 'बालिका वधू' शोने आणि त्यातील आनंदीने सर्वांच्या मनात घर केले. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहे. अविका गौर हे टिव्ही इंडस्ट्रीतील महत्त्वाचे नाव आहे. अविका गौर आणि मिलिंद चंदवानीची पहिली भेट एनजीओच्या एका इव्हेंटमध्ये झाली. त्या दोघांमध्ये मग मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात करण्यात आले.
अविका गौरचा होणारा नवरा मिलिंद चंदवानी 'कॅम्प डायरीज' या एनजीओचा बेंगळुरू येथील संस्थापक आहे. त्याने 'एमटीव्ही रोडीज रिअल हिरोज'मध्येही सहभाग घेतला होता. मीडिया रिपोर्टनुसार, अविका गौर आणि मिलिंद चंदवानी गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.