
मराठी अभिनेता सारंग साठ्येने त्याची पार्टनर पॉला मॅकग्लिनसोबत गुपचुप लग्न केलं.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना लग्नाची आनंदाची बातमी दिली.
सारंग-पॉला अनेक वर्षांच्या नात्यानंतर विवाहबंधनात अडकले.
Sarang Sathaye And Paula Mcglynn : लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, कॉमेडियन सारंग साठ्ये विवाहबंधनात अडकला आहे. सारंग आणि त्याची पार्टनर पॉला यांनी लग्न केले आहे. मागील अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सारंग आणि पॉला हे दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांचे भारतीय डिजिटल पार्टी हे युट्यूब चॅनल तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
'हो आम्ही लग्न केले आहे! तुम्हा सर्वांना माहीत आहे की, लग्न आमच्यासाठी कधी खास प्राधान्याचं नव्हतं. पण फक्त एक गोष्ट जी आम्हाला वेगळे ठेवू शकली ती म्हणजे तो कागदाचा तुकडा. मागचं वर्ष कठीण होतं. जगात संघर्ष वाढत होता. द्वेष इतका वाढत होता की, आम्ही वेगळे होऊ अशी भीती पहिल्यांदाच आम्हाला वाटत होती. पण प्रेम नेहमीच द्वेषावर विजय मिळवते. आमचे प्रेम, आमच्यातील मैत्री अबाधित ठेवण्यासाठी आम्ही लग्न केले आहे. २८ सप्टेंबर रोजी आम्हाला तो कागद मिळाला', असे सारंग आणि पॉला यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
'लग्न हा वैयक्तिक विषय होता. आमचे जवळचे नातेवाईक, काही जिवलग मित्र कोव्हमधील आमच्या आवडत्या झाडाभोवली जमले होते. आमच्या कुटुंबांना एकत्र आणण्याची ही एक उत्तम संधी होती. आम्ही एकमेकांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायली. आम्ही जसे आहोत तसेच राहण्याचा प्रयत्न करु असे आम्ही एकमेकांना वचन दिले! तर ही आमची छोटीशी प्रेमकहाणी! प्रेम नेहमीच जिंकेल! आणखी फोटो येणार आहेत.'
सारंग आणि पॉला यांची पहिली भेट २०१२ मध्ये झाली होती. टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. एका सिनेमासाठी पॉला असिस्टंट डायरेक्ट म्हणून काम करायला आली होती. त्या सिनेमामध्ये सारंग देखील काम करत होता. या निमित्ताने त्यांची तिसऱ्यांदा भेट झाली. तेव्हापासून त्यांच्या गप्पा सुरु झाल्या, असे सारंगने एका मुलाखतीत सांगितले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.