
आशिया कप २०२५ जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या इन्स्टा स्टोरीची चर्चा रंगली.
बुमराहने तिसऱ्या संघात सामील होणार असल्याचे संकेत दिले.
या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Asia Cup 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. पाकिस्तानवर ५ विकेट्सने मात करत भारताने पुन्हा एकदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली. आशिया कप संपताच बुमराहने दुसऱ्या संघात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा संघ कोणता? जाणून घेऊयात...
भारताने आशिया कप जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले. या स्टोरीमध्ये 'होय! अफवा खऱ्या आहेत. मी तिसऱ्या संघात सामील होत आहे. मी उद्या त्याबाबत घोषणा करेन' बुमराहने असे म्हटले आहे. या स्टोरीमुळे चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत, या प्रश्नांची उत्तरे उद्या बुमराहच देणार आहे.
बुमराह कोणत्या तिसऱ्या संघासाठी खेळणार आहे?
जसप्रीत बुमराहची इंस्टाग्राम स्टोरी पाहिली आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या संघात (ब्लू टीममध्ये) सामील होणार असल्याचे समजते. भारतीय संघाला जर्सीमुळे मेन इन ब्लू असे म्हटले जाते. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबईच्या संघाचा रंग देखील निळाच आहे. या दोन संघाव्यतिरिक्त इतर अनेक संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. आता या सर्व संघांपैकी कोणत्या संघात बुमराह सामील होणार आहे? याचे उत्तर गुलदस्त्यात आह.
जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी विभागातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. आशिया कपमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानचे दोन गडी बाद केले होते. जसप्रीत बुमराहने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे केलेल्या घोषणेची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.