Crime: आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर सुटकेसमध्ये भरून नदीत फेकला

Uttar Pradesh Crime: तरुणाचे गर्लफ्रेंडसोबत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने गर्लफ्रेंडची गळा आवळून हत्या केली. मृतदेहासोबत सेल्फी काढला. त्यानंतर तरुणाने गर्लफ्रेंडचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीत फेकून दिला.
Crime: आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर सुटकेसमध्ये भरून नदीत फेकला
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने गर्लफ्रेंडला भयंकर मृत्यू दिला. तरुणाने गर्लफ्रेंडची हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून यमुना नदीमध्ये फेकून दिला. २० वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. ही घटना कानपूरमध्ये घडली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहपूर येथे राहणाऱ्या सूरज कुमार उत्तम (२० वर्षे) या तरुणाने गर्लफ्रेंड आकांक्षा उर्फ माहीची गळा दाबून हत्या केली. सूरजचे एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. यावरूनच सूरज आणि माहीमध्ये वाद झाला. माहीने त्याला यावरूनच जाब विचारला. त्या महिलेसोबतचं नातं संपवावे असा दबाव माहीने सूरजवर टाकला. त्यानंतर संतप्त झालेल्या सूरजने गळा दाबून तिची हत्या केली.

Crime: आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर सुटकेसमध्ये भरून नदीत फेकला
Buldhana Crime News : आश्रम शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरण, मुख्य आरोपीला ५ वर्षांची शिक्षा, १७ जण निर्दोष

कानपुरच्या सुजनीपूरमध्ये माही राहत होती. ती एका दुकानामध्ये काम करत होती. ती हनुमंत विहार परिसरात भाड्याच्या घरात राहत होती. सूरज त्याठिकाणी नेहमी यायचा. सोमवारी सूरज आणि माहीचे कडाक्याचे भांडण झाले. त्या महिलेसोबतचं नातं तोडून टाक असे माहीने सूरजला खडसावून सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या सूरजने तिची गळा दाबून हत्या केली. मृतदेहासोबत सेल्फी घेतला. त्यानंतर आपल्या मित्राला बोलावून घेतला.

Crime: आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर सुटकेसमध्ये भरून नदीत फेकला
Chikhali Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास; चिखली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

सूरजचा मित्र आशिष कुमार (२१ वर्षे) माहीच्या घरी आला. दोघांनी एका सूटकेसमध्ये माहीचा मृतदेह भरला. त्यानंतर दुचाकीवरून दोघे जण चिल्ला पुलावर गेले. त्याठिकाणी त्यांनी ही सुटकेस यमुना नदीत फेकून दिली. सूरजने माहीचा मोबाइल कानपूर सेंट्रल स्टेशनवर जाऊन ट्रेनमध्ये ठेवून दिला. त्याने असं करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने माहीच्या घरामध्ये असलेले त्याचा सामान देखील हटवले आणि पोलिसांना सांगितले की माहीने मला माझे सामान घेऊन जाण्यास सांगितले.

Crime: आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर सुटकेसमध्ये भरून नदीत फेकला
Bhandara Crime : दारूच्या नशेत बारमध्ये तुफान राडा; पोलीस नायकावर फोडला काचेचा ग्लास, पोलिसासह एक जखमी

२२ जुलै रोजी माहीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना माहीचा फोन सापडला. फोनमधील कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यास मदत झाली. आरोपी सूरजने आपला गुन्हा कबूल केला. पोलिस माहीचा मृतदेह नदीमध्ये शोधत आहेत.

Crime: आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर सुटकेसमध्ये भरून नदीत फेकला
Crime: भयंकर! अंघोळ करणाऱ्या बायकोवर चाकूने सपासप वार, जीव घेतल्यानंतर तरुणाने फेसबुकवर लाईव्ह केलं अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com