Bhandara Crime : दारूच्या नशेत बारमध्ये तुफान राडा; पोलीस नायकावर फोडला काचेचा ग्लास, पोलिसासह एक जखमी

Bhandara News : मद्यपानातून उद्भवणाऱ्या हिंसाचाराचे आणखी एक उदाहरण असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, फरार आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना
Bhandara Crime
Bhandara CrimeSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: रात्रीच्या सुमारास बारमध्ये उद्भवलेल्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले. दारूच्या नशेत असलेल्यांमध्ये जोरदार राडा होऊन हाणामारी झाली. यात एकाने पोलीस नायकावर बारमधील काचेचा ग्लास फोडल्याचा प्रकार घडला असून या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यासह एकजण जखमी झाला असून घटनेतील दोन आरोपी फरार झाले आहेत. 

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील आस्था बारमध्ये शनिवारी रात्री उशिरा हा तुफान राडा झाला होता. मद्यधुंद अवस्थेतून उद्भवलेल्या किरकोळ वादानंतर हिंसक वळण घेतले. या घटनेत पोलीस नायक राकेश पटले हे आपला मित्र सुबोध सांडेकर यांच्यासह बारमध्ये उपस्थित होते. याच दरम्यान आरोपींमध्ये किरकोळ वाद झाला. हा वाद काही क्षणांतच चिघळत गेला आणि वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहचला होता. 

Bhandara Crime
Ahilyanagar : अंत्यविधीसाठी जागा मिळेना; नातेवाईकांनी मृतदेह आणला तहसील कार्यालय आवारात

काचेचा ग्लास मारून दोघांवर हल्ला  

दरम्यान आरोपींनी काचेचा ग्लास राकेश पटले यांच्या डोक्यावर फोडून गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करायला गेलेल्या सांडेकर यांच्यावर देखील आरोपींनी काचाचा ग्लास फोडून हल्ला केला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. दोन्ही जखमींना तातडीने तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील गंभीर अवस्थेतील सुबोध सांडेकर यांना पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

Bhandara Crime
Bhiwandi : अनुदानित युरिया खताचा अवैध साठा; २ ट्रक खत जप्त, गोडाऊनला लावले सिल

दोघांना अटक 

घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहार. त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. मात्र, अजून दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com