Ahilyanagar : अंत्यविधीसाठी जागा मिळेना; नातेवाईकांनी मृतदेह आणला तहसील कार्यालय आवारात

Ahilyanagar News : अंत्यविधी प्रक्रिया पार पडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नातेवाईनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील प्रशासनाकडून कोणी दखल घेतली नाही. यामुळे अंत्यविधीच्या प्रतिक्षेत असलेल्या नातेवाईकांचा संताप अनावर
Ahilyanagar News
Ahilyanagar NewsSaam tv
Published On

सुशील थोरात 

अहिल्यानगर : गावात सर्व सुविधा गरजेच्या आहेत. ज्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी गावाच्या बाहेर स्मशानभूमीची व्यवस्था ग्रामपंचायत मार्फत केली जात असते. मात्र गावात स्मशानभूमी तर सोडा मात्र अंत्यविधी करण्यासाठी जागा मिळत नसल्याने मृतदेह दोन दिवस झाले तसाच आहे. यामुळे संतप्त नातलग व ग्रामस्थांनी मृतदेह थेट तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पाटेवाडी या गावांमध्ये प्रकार घडला आहे. दरम्यान गावातील बेबी पवार (वय ६५) या आदिवासी वृद्ध महिलेचा रविवारी मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर दोन दिवस झाले असून महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी जागा मिळत नसल्याची समस्या समोर आली आहे. तर अंत्यविधी करायचा कोठे असा प्रश्न नातेवाइकांसमोर उभा होता. जागा मिळत नसल्यामुळे मृतदेह तहसील कार्यालया समोर आणला आहे.

Ahilyanagar News
Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर; विरेगाव येथे पुराच्या पाण्यात शेतकरी शेतातच अडकले, मदतीसाठी बचाव पथक रवाना

ग्रामस्थांकडून करण्यात आला विरोध 

दरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधी करण्यासाठी नेला. ती अंत्यविधीची जागा होती त्या सरकारी जागेमध्ये घेऊन गेले होते. यावेळी काही ग्रामस्थांनी त्याठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी विरोध केला. यानंतर आदिवासी बांधवांनी या प्रकाराबाबत प्रशासनाला कळविले देखील होते. मात्र प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे कालपासून मृतदेहाचा अंत्यविधी करण्याचे राहिले आहे.  

Ahilyanagar News
Heavy Rain : ढगफुटी सदृश्य पावसाने होत्याचे नव्हते केले; शेताला तलावाचे स्वरूप, दोन एकर सोयाबीनची गंज पाण्याखाली

तहसील कार्यालयात अंत्यविधी करण्याचा इशारा 

अंत्यविधी प्रक्रिया पार पडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नातेवाईनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील प्रशासनाकडून कोणी दखल घेतली नाही. यामुळे अंत्यविधीच्या प्रतिक्षेत असलेल्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. यानंतर आज अखेर मृतदेह घेऊन सर्व आदिवासी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालय बाहेर आंदोलन सुरू केले आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातच टिकाव खोरे घेऊन त्या ठिकाणी खड्डा घेऊन अंत्यविधी करण्याचा इशारा देत आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com