Akshaye Khanna SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akshaye Khanna : "औरंगजेब हा...",'छावा'ची ऑफर स्वीकारण्यापूर्वी अक्षय खन्नानं व्यक्त केली होती इच्छा

Chhaava Movie Aurangzeb Role : 'छावा' चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला आहे. ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी अक्षय खन्ना नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आजवर बंपर कमाई केली आहे. आता ही 'छावा' (Chhaava) थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस 'छावा'च्या कलेक्शनमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (Akshaye Khanna) झळकला आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षयचे भरपूर कौतुक केले आहे. मात्र अक्षयने 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यापूर्वी चित्रपटाच्या टीम समोर आपली एक इच्छा व्यक्त केली होती. याचा खुलासा आता करण्यात आला आहे. 'छावा' चित्रपटाचे लेखक ऋषी विरमानी यांनी अक्षय खन्नाची औरंगजेब या भूमिकेसाठी कास्टिंग कशी झाली याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

एका मिडिया मुलाखतीत ऋषी विरमानी यांनी सांगितले की,"'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार, अशी चर्चा सुरू असताना अभिनेता अक्षय खन्ना यांचे नाव सुचवण्यात आले. आजवर अक्षय खन्ना यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना भेटायचे ठरवले. सरांनी स्क्रिप्ट ऐकल्यावर त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी चित्रपट करण्यास होकार दिला."

ऋषी विरमानी यांनी सांगितले की, तेव्हा अक्षय खन्ना म्हणाले, " प्रेक्षकांनी मला ओळखावे ही माझी इच्छा नाही. औरंगजेब हा औरंगजेबच वाटला पाहिजे." "चित्रपटासाठी त्यांनी या भूमिकेचा सखोल अभ्यास केला. अक्षय खन्ना सरांनी चित्रपटात अतिशय चांगले काम केले आहे." चित्रपटातल अक्षय खन्नाच्या भूमिकेने सर्वांना भुरळ घातली. त्याचा लूक, बोलण्याची पद्धत सर्वच लय भारी होते.

'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'छावा' चित्रपटातून लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे. 'छावा' चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईची भूमिकेत पाहायला मिळत आहे 'छावा' विकी कौशलच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT