Shreya Maskar
विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर सर्वत्र अक्षय खन्नाच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
'छावा' चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिकेत पाहायला मिळत आहे.
'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.
छावा चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना पहिली पसंती नव्हती.
मीडिया रिपोर्टनुसार, औरंगजेबाच्या भूमिकेसाठी बॉलिवूडचे सुपरस्टार अनिल कपूर यांना विचारण्यात आले होते.
सुरुवातीला अनिल कपूर यांनी हे पात्र साकारण्याची तयारी दाखवली होती.
मात्र शेवटी काही कारणास्तव अनिल कपूर चित्रपट करू शकले नाही.