मराठी चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. चित्रपटात कॉमेडीची मेजवानी पाहायला मिळत आहे. अशात आता स्वप्नील जोशीचा (Swapnil Joshi) एक चित्रपट प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'सुशीला सुजीत' (Susheela Sujeet) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अलिकडेच 'सुशीला सुजीत' चित्रपटातील 'चिऊताई चिऊताई दार उघड' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. 'चिऊताई चिऊताई दार उघड' (Chiu Tai Chiu Tai Daar Ughad) या गाण्यावर सर्वजण थिरकताना दिसत आहे. सेलिब्रिटी देखील यावर भन्नाट रील्स बनवत आहेत. अशीच एक भारी रील मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सध्या या चित्रपटाचे धमाकेदार प्रमोशन सुरू आहे. त्यामुळे 'सुशीला सुजीत' चित्रपटाची टीम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या सेटवर पोहचले आणि त्यांनी शोमध्ये धुमाकूळ घातला आहे. तेव्हा प्राजक्ता माळी आणि स्वप्नील जोशी 'चिऊताई चिऊताई दार उघड' या गाण्यावर थिरकताना दिसले. प्राजक्ता माळीने त्यांच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता आणि स्वप्नील 'सुशीला सुजीत' चित्रपटातील 'चिऊताई चिऊताई दार उघड' गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे
प्राजक्ता माळी आणि स्वप्नील जोशी यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच प्राजक्ता माळीने या व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "मला माहितीए मी 'चिऊताई reel स्पर्धेचे' सगळे नियम मोडलेत. पण ही #reel स्पर्धेसाठी नाही, शुभेच्छांसाठी आहे. सहकलाकार जे या चित्रपटाद्वारे निर्माते होतायेत त्यांना मनापासून आभाळभर शुभेच्छा...'सुशीला सुजीत' - १८ एप्रिल पासून तुमच्या भेटीला."
'सुशीला सुजीत' चित्रपटातील 'चिऊताई चिऊताई दार उघड' हे गाण्यावर चित्रपटात अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनी यांची जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या गाण्यातील केमेस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. 'सुशीला सुजीत'चित्रपटाची कथा प्रसाद ओकने केले असून दिग्दर्शनाची धुराही त्याने सांभाळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.