Shruti Kadam
प्राजक्ता २०११ मध्ये मराठी दूरचित्रवाणी स्टार प्रवाह वरील "सुवासिनी" मध्ये दिसली होती
त्यानंतर २०१३ साली प्राजक्ताने झी मराठीच्या जुळून येती रेशीमगाठी मध्ये मेघना देसाईची भूमिका करताना दिसली.
२०१४ मध्ये, तिने राजेश शृंगारपुरे अभिनीत मराठी चित्रपट संघर्ष मध्ये बिजलीची भूमिका केली होती.
२०१७ मध्ये ती हंपी मध्ये सोनाली कुलकर्णी सोबत गिरीजा म्हणून दिसली होती.
सप्टेंबर २०१७ च्या पार्टी चित्रपटात सुव्रत जोशी सोबत दिसली होती.
२०१८ पासून सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे.
२०२० मध्ये झी मराठी साठी मस्त महाराष्ट्र ट्रॅव्हल शो होस्ट केला.
२०२४ साली आलेल्या फुलवंती या चित्रपटातून तिने चित्रपट निर्मिती करण्यास सुरुवात केली.