Amruta Khanvilkar : बाबो! चंद्रा करणार आयटम साँग, 'चिऊताई' गाण्याची पहिली झलक पाहिलीत का?

Amruta Khanvilkar Item Song : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर 'सुशीला- सुजीत' चित्रपटात आयटम साँग करणार आहे. 'चिऊताई' गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Amruta Khanvilkar Item Song
Amruta KhanvilkarSAAM TV
Published On

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा खूप हिट झाला. यामुळे तिला खूप प्रसिद्धी देखील मिळाली आहे. आता अमृताने चाहत्यांना एक खास सरप्राईज देऊन खुश केले आहे. अमृता खानविलकर एका नवीन चित्रपटात झळकणार आहे.

अमृता खानविलकर 'सुशीला- सुजीत' ( Susheela Sujeet ) चित्रपटात पाहायला मिळणा आहे. अमृता या चित्रपटात एक आयटम साँग करणार आहे. तिने आपल्या गाण्याची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'सुशीला- सुजीत' चित्रपटातील 'चिऊताई चिऊताई दर उघड' या आयटम साँगवर अमृता खानविलकर जबरदस्त डान्स करणार आहे. अमृता अभिनयासोबत एक उत्तम डान्सर देखील आहे.

अमृता खानविलकर तिच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदा आयटम साँग केले आहे. कायम उत्तम भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करून राहणारी अभिनेत्री असली तरी तिच्या नृत्याचे सगळेच चाहते आहेत. 'चिऊताई चिऊताई दर उघड' गाण्याची पहिली झलक पाहून चाहते चित्रपटासाठी उत्सुक झाले आहेत. अमृता खानविलकरसोबत या गाण्यामध्ये मराठी अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani ) देखील पाहायला मिळत आहे.

अमृता खानविलकरने अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्या आहे. त्यानंतर आता अमृता या चित्रपटात पहिल्यांदा आयटम साँग करणार असून तिच्या नृत्याची पुन्हा एकदा जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. गाण्यातील तिचा लूक आणि अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Amruta Khanvilkar Item Song
Chhaava : महाराष्ट्रानंतर दक्षिणेतही 'छावा' फोडणार डरकाळी! तेलुगू भाषेतील धमाकेदार ट्रेलर रिलीज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com