दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड असलेल्या रिया चक्रवर्तीचा वाढदिवस आहे. (Rhea Chakraborty Birthday News) अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही तिच्या अभिनयामुळे नाही तर, काही सर्वाधिक चर्चेत राहिली. रिया चक्रवर्तीच्या वैयक्तिक आयुष्यातच नाही तर, व्यावसायिक आयुष्यातदेखील अनेक चढ-उतार तिने पाहिले आहेत.
अभिनेत्रीने आपल्या अभिनय कारकिर्दिला टीव्ही इंडस्ट्रीतून सुरूवात केली होती. रियाने टॉलिवूडसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच अभिनेत्रीने चित्रपट केले असून त्यात ते सर्व चित्रपट फ्लॉप. फ्लॉप चित्रपट देऊनही कोट्यवधीची मालकीण आहे. जाणून घेऊया रियाच्या नेटवर्थबद्दल...
रियाने तिच्या फिल्मी करियरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली. साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवण्याचा प्रयत्न केला. पण तोही अपयशी ठरला. रियाने खूपच कमी चित्रपटात काम केलेले आहे, पण त्यातही ते सर्व फ्लॉप ठरले. रियाने आपल्या करियरची सुरुवात व्हिडिओ जॉकी म्हणून केली आहे आणि त्यानंतर तिने अभिनयात पाऊल ठेवले.
२००९ मध्ये, रिया चक्रवर्तीने एमटीव्हीवरील 'टीव्हीएस स्कूटी टीन डिवा' या रिॲलिटी शोमधून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले. यानंतर, तिने अनेक टीव्ही शोचेही होस्टिंग केले. २०१२ मध्ये रिहाने 'टुनिगा टुनिगा' चित्रपटातून टॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्यानंतर रियाने 'मेरे डॅड की मारुती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. यानंतरही रिया अनेक चित्रपटांमध्ये दिसली पण तिचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
मिडिया रिपोर्टनुसार, रिया महिन्याला २.५० लाखांहून अधिकची कमाई करते. तर वर्षाला ती ३० ते ३५ लाखांची कमाई करते. चित्रपटांव्यतिरिक्त ती ब्रँड अँडोर्समेंटद्वारे कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्तीची एकूण संपत्ती सुमारे १.५ मिलियन डॉलर म्हणजेच ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रिया चक्रवर्ती मुंबईत एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्या त्या घराची किंमत ८५ लाख रुपये इतकी आहे. ट्रेड ॲनालिस्टनुसार, रियाला अलिशान गाड्यांची फारच आवड आहे. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.