Rhea Chakraborty In Bollywood Movie: रिया चक्रवर्ती, संजय लीला भन्सालीच्या चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका?

Sanjay Leela Bhansali Movie: संजय लीला भन्साली सध्या 'बैजू बावरा' चित्रपटाची तयारी करत आहेत.
Rhea Chakraborty Upcoming Project
Rhea Chakraborty Upcoming ProjectInstagram @rhea_chakraborty
Published On

Rhea Chakraborty And Sanjay Leela Bhansali:

दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचे चित्रपट मोठे आणि भव्य सेटसाठी ओळखले जातात. भन्साली यांनी पद्मावत, देवदास, बाजीराव मस्तानी, राम - लीला, गंगुबाई काठियावाडीसारखे अनेक भव्यदिव्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

संजय लीला भन्साली सध्या 'बैजू बावरा' चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रींचे भूमिका कोण साकारणार यावर अनेक महिने चर्चा सुरू आहे. चित्रपटातील अभिनेत्रीविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे. हे नाव ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल.

Rhea Chakraborty Upcoming Project
Munna Bhai 3 Shooting: 'मुन्नाभाई ३'चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुदार अभिनेत्री रिया चक्रवर्तीने 'बैजू बावरा' चित्रपटासाठी ऑडिशन दिले आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रिया या चित्रपटाच्या कास्टिंगमुळे चर्चेत आहे. सद्या रिया सोनू सूड होस्ट करत असलेल्या रिऍलिटी शोमध्ये मेन्टॉर आहे.

बैजू बावरा स्टारकास्ट

'बैजू बावरा'च्या निर्मात्यांनी रणवीर सिंग आणि आलिया भट यांना या चित्रपटासाठी कास्ट केले असल्याची देखील चर्चा होती. संजय लीला भन्साली त्यांच्या चित्रपटाविषयी अधिकृत माहिती देत नाहीत तोवर कोणताही निकष लावणे कठीण आहे. संजय लीला भन्साली त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट 'हिरामंडी'मध्ये बिजी आहेत.

हिरामंडी या वेबसीरीजची घोषणा झाल्यापासून चर्चा आहे. संजय लीला भन्साली यांची 'हिरामंडी' ही वेबसीरीज OTT प्लॅटफॉर्मसाठी बनवली जात आहे. संजय लीला भन्साली यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी आणि हुमा कुरेशी यांच्यासह अनेक प्रतिभावान महिला या वेबसीरीजमध्ये दिसणार आहेत. रिचा चड्ढा, मनीषा कोईराला आणि संजीदा शेख या अभिनेत्री देखील या वेबसीरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. (Latest ENtertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com