Ranveer Singh To Gain 15 Kg For His Next Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Gain 15 Kg Weight : आगामी चित्रपटासाठी रणवीर सिंह वाढवतोय १५ किलो वजन, 'या' पदार्थांचं करतोय सेवन

Ranveer Singh To Gain 15 Kg For His Next Film : रणवीर सिंह सध्या डाएट वैगेरे न करता पौष्टिक पदार्थ खाऊन आपलं वजन वाढवताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तो वजन वाढवतानाचे अनेक फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडच्या क्यूट कपलपैकी एक आहे. लवकरच हे कपल आई- बाबा होणार आहेत. हे कपल कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. अशातच रणवीर घरी बाळ येण्याची जोरदार तयारी करीत आहे. सध्या रणवीर डाएट वैगेरे न करता पौष्टिक पदार्थ खाऊन आपलं वजन वाढवताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तो वजन वाढवतानाचे अनेक फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर बाबा होण्यापूर्वी १५ किलो वजन वाढवणार आहे. त्यामुळे तो सध्या आजकाल भरपूर मिठाई आणि फ्रेंच फ्राईज खात आहे. प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. शोभा डे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, शोभा डे आणि रणवीर अलिबागमधील एका कॅफेमध्ये बसलेले दिसत आहे. यावेळी रणवीरने व्हाईट टी-शर्ट आणि खूप दाढीमध्ये तो दिसत आहे. यासोबतच रणवीरने ब्लॅक गॉगलही वेअर केलेला आहे. सध्या रणवीरच्या नव्या लूकची तुफान चर्चा होत आहे.

खरंतर, रणवीर त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे ही वजन वाढवताना दिसत आहे. लवकरच रणवीरचा आगामी चित्रपट येणार आहे. पण नेमका त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव सध्या तरी गुलदस्त्यात आहे. शोभा डे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून अनेक युजर्सकडून रणवीरच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. रणवीर शेवटचा 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेली होती.

रणवीर सिंह लवकरच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या कॉप युनिव्हर्स चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटात अजय देवगण आणि अक्षय कुमारही दिसणार आहे. याशिवाय तो 'डॉन ३'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

New Year 2026 Trip : पांढरी वाळू, निळाशार समुद्र, सूर्यास्ताचा नजारा; मुंबईजवळ कॅम्पिंगचे सुंदर लोकेशन

Horoscope: ओळखीचा होणार फायदा, व्यवसायात धनलाभाचा योग; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी खास आहे आजचा दिवस

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

SCROLL FOR NEXT