Shruti Vilas Kadam
चण्यामध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चण्याचा ज्यूस प्यायल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.
चण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे चण्याचा ज्यूस पिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊ शकते.
चण्याचा ज्यूस पिल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
चण्यामध्ये असलेले पोषक घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे चण्याचा ज्यूस हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
चण्याचा ज्यूस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही तो फायदेशीर मानला जातो.
चण्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे चण्याचा ज्यूस नियमित पिल्यास त्वचा चमकदार राहते.
चण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे आजारांपासून बचाव होऊ शकतो.