Ketaki Chitale :  Saam tv
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale : फुले,शाहू, आंबेडकरांचं नाव सरकारने घेऊ नये; केतकी चितळेचा राज्य सरकारवर संताप

Ketaki Chitale on waqf board : अभिनेत्री केतकी चितळेने राज्य सरकारने वक्फ बोर्डा'ला जाहीर केलेल्या निर्णयावरून टीका केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात केतकी चितळेने संताप व्यक्त केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने राज्य सरकारच्या 'वक्फ बोर्डा'ला जाहीर केलेल्या १० कोटींच्या निधीवरून टीका केली आहे. वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी जाहीर करण्याच्या निर्णयावरून केतकीने राज्य सरकारमधील ३ प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं. या निर्णयावरून, राज्य सरकारने फुले,शाहू, आंबेडकरांचं सरकारने घेऊ नये, असा संताप केतकीने व्यक्त केला.

वक्फ बोर्डाला जाहीर केलेल्या निधीवरून अभिनेत्री केतकी चितळने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओतून केतकीने राज्य सरकारवर टीका केली. केतकी चितळे म्हणाली, 'नमस्कार, धक्कादायक बातमी वाचून उठली. त्यामुळे काय बोलू कळत नाहीये. ज्या लोकांनी तुम्हाला मते दिलं नाही. त्यांच्या बळकटीकरणासाठी १० कोटी देत आहात. तुम्ही बधीर आहात की, तुम्ही आम्हाला बधीर करुन सोडणार आहात'.

'लोकसभेत कोणाला मत द्यायचं, हे ठरलं होतं. त्यावेळी माझा पंतप्रधान ठरला होता. पण विधानसभेला कोणता झेंडा घेऊ हाती? आता माझं ठाम मत झालं आहे की, तुम्ही वक्फ बोर्डाला १० कोटी मंजूर करताय. तुमचं तिघांचं सरकार आहे. तुम्ही विधानसभेत मत किती संख्येने कमी करणार, हे तुमचं ध्येय आहे का? असा सवाल केतकीने केला.

वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी पैसा देत आहेत का? वक्फ बोर्डामधील माणसे तुमच्याजवळ जमिनी मागण्यासाठी आलं तर काय कराल. यामुळे हिंदूच्या अनेक जागा हडपडल्या आहेत. सरकारनंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जागा आहेत. संघानंतर सनातनी लोकांना तोडत आहात. तुमच्यामुळे मतदान करताना नोटाचं बटन दाबेल, असा इशारा केतकीने दिला.

'मानखुर्द बांगलादेशींनी भरलेलं आहे. तुम्हाला छत्रपती संभाजीनगर नको, तुम्हाला औरंगाबाद हवंय. महाराष्ट्राचं नाव बदलून टाका. फुले,शाहू, आंबेडकरांचं नाव सरकारने घेऊ नये. त्यांनी हे काम कधीही केलं नाही. त्यांचं नाव तोंडातूनही काढू नका,अशीही चितळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT