Janhvi Kapoor And Shikhar Pahariya News Instagram/ @janhvikapoor
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor And Shikhar Pahariya News: "माझ्याकडेही अन् त्याच्याकडेही..."; शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर लग्न केव्हा करणार? अभिनेत्रीने सांगूनच टाकलं

Janhvi Kapoor On Sikhar Pahariya : गेल्या कित्येक वर्षांपासून शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. अशातच जान्हवीला लग्नाबद्दल विचारण्यात आले होते.

Chetan Bodke

अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलिवूडच्या फेमस स्टारकिड्स पैकी एक आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची ती मोठी लेक आहे. जान्हवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे. जरीही ती स्टारकिड्स असली तरीही तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

जान्हवी अभिनयामुळेच नाही तर, तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहिली आहे. जान्हवी आणि शिखर पहाडिया यांचं रिलेशनशिप जगजाहीर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

सध्या जान्हवी 'उलझ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच अभिनेत्रीने पिंकव्हिलाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिला शिखर पहारियासोबत केव्हा लग्नगाठ बांधणार ? असा प्रश्न विचारला होता. याबद्दल तिने सांगितले की, "मी माझ्या आयुष्यात खूप आनंदात आहे. माझ्याकडेही आणि त्याच्याकडेही वेळ नाही. " जान्हवीला तिच्या चाहत्याने तिच्या आणि शिखरच्या हॅशटॅगबद्दलही नाव सजेस्ट केला होता.

'जस्सी' असं जान्हवीला तिच्या चाहत्याने नाव सजेस्ट केलं. पण तिला 'जनह्वर' असं हॅशटॅग हवं आहे. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदेंची मोठी मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा तो मुलगा आहे. शिखर पहाडिया अनेकदा बॉलिवूड पार्टीमध्ये किंवा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नामध्ये तो उपस्थिती लावत असतो. शिखर आणि जान्हवी दोघेही अनंत- राधिकाच्या लग्नाला, संगीत सेरेमनी, हळदी आणि दोन्हीही प्री- वेडिंगला एकत्र स्पॉट झाले होते.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटामध्ये जान्हवी आणि राजकुमार रावने एकत्र स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेली होती. जान्हवी आणि राजकुमारच्या जोडीला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. त्यानंतर जान्हवी 'उलझ' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याशिवाय तिच्याकडे आणखी बरेच चित्रपटही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

SCROLL FOR NEXT