Ranbir- Alia Celebrate Diwali In New Bungalow Instagram
मनोरंजन बातम्या

Ranbir- Alia Celebrate Diwali In New Bungalow : आलिया- रणबीर लेक राहासोबत नव्या घरात सेलिब्रेट करणार दिवाळी, जोमात सुरू आहे घराचे काम

Ranbir Kapoor Alia Bhatt To Celebrate Diwali In New Bungalow : आलिया आणि रणबीरच्या नव्या घराचं काम शेवटच्या टप्प्यावर असून येत्या दिवाळीत आलिया, रणबीर आणि राहा या घरात गृहप्रवेश करणार आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)ची लेक राहा कपूर (Raha Kapoor)ची सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. आलिया आणि रणबीरने लेक राहाच्या नावावर गेल्या काही दिवसांपूर्वी घर केले होते. बालपणातच राहा कोट्यवधींची मालकिण झालेली आहे. सध्या राहाच्या ह्या नव्या घराची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. शेवटच्या टप्प्यावर त्यांच्या घराचं काम सुरू असून येत्या दिवाळीत आलिया, रणबीर आणि राहा या घरात गृहप्रवेश करणार आहे.

सध्या सोशल मीडियावर रणबीर आणि आलिया नव्या घराचं बांधकाम पाहायला गेल्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या अलिशान बंगल्याची सध्या चाहत्यांमध्ये तुफान चर्चा होत आहे. 'हिंदुस्थान टाईम्स'च्या वृत्तानुसार, येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये रणबीर आणि आलिया नव्या घरात शिफ्ट होणार आहे. त्यांच्या अलिशान अपार्टमेंटचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. अपार्टमेंटमधील काही किरकोळ काम सध्या सुरू असून येत्या एक ते दीड महिन्यांत ते पूर्ण होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, आलिया आणि रणबीर घराचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बंगल्याची किंमत २५० कोटी इतकी आहे. आलिया, रणबीर आणि राहा २०२४ ची दिवाळी नव्या अपार्टमेंटमध्ये सेलिब्रेट करणार आहे. रणबीर आणि आलिया सध्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये राहतात. २०२२ मध्ये त्याच घरात रणबीर आणि आलियाचे लग्न झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन

Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

Family Pension म्हणजे काय रं दादा ? कोणाला मिळतो लाभ? जाणून घ्या सर्व काही

Manikrao Kokate: विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर बच्चू कडूंचा प्रहार|VIDEO

Maharashtra Politics : सरकारचा पैसा आहे, कितीही मागा आपल्या बापाचं काय जातंय; मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत

SCROLL FOR NEXT