Raaha Kapoor Bollywood Richest Star Kids: रणबीर- आलियाकडून लेक राहाला मिळालं मोठं गिफ्ट, होणार बी- टाऊनमधील श्रीमंत स्टार-किड

Raaha Kapoor News: राहा आता लवकरच बॉलिवूडमधली श्रीमंत स्टार किड्स म्हणून ओळखली जाणार आहे.
Raaha Kapoor Bollywood Richest Star Kids
Raaha Kapoor Bollywood Richest Star KidsInstagram

Raha Kapoor Richest Kid In Bollywood

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)च्या लेक राहा कपूर (Raha Kapoor)ची सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळत आहे.

ख्रिसमसच्या दिवशी पहिल्यांदा रणबीर- आलियाने मीडियासमोर लेक राहाला आणलं. जवळपास १४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रणबीर आणि आलियाने राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवला. सध्या आलियाची लेक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. राहा आता लवकरच बॉलिवूडमधली श्रीमंत स्टार किड्स म्हणून ओळखली जाणार आहे. (Bollywood)

Raaha Kapoor Bollywood Richest Star Kids
Box Office Collection: 'मडगांव एक्स्प्रेस' सुसाट, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाला मागे टाकत केली इतकी कमाई

रणबीर- आलिया बांद्रा परिसरामध्ये, एक अलिशान बंगला बांधत आहेत. जवळपास त्यांच्या त्या बंगल्याची किंमत २५० कोटींच्या आसपास आहे. त्या नव्या अलिशान बंगल्याला आलिया आणि रणबीर लेक राहाचं नाव देणार आहेत.

काही मीडिया रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीरच्या नव्या आलिशान बंगल्याची किंमत शाहरुखच्या मन्नतला आणि अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला देखील मागे टाकणारे असल्याचं सांगितलं जात आहे.

बॉलिवूडच्या स्टारकिड्समध्ये राहा कपूरचाही समावेश होतो. पण इतक्या लहान वयातच ती कोट्यवधींची मालकीण झाल्याने तिचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. (Bollywood News)

त्यांच्या बंगल्याचं सध्या बांधकाम सुरू असून बंगला तयार होण्यासाठी अजून काही महिने लागणार आहेत. या संपूर्ण बंगल्याची किंमत २५० कोटींच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त रणबीर आणि आलियाचे वांद्रेमध्ये एकूण चार फ्लॅट्स आहेत, त्यांची किंमतही कोट्यवधींच्या घरामध्ये आहे. या नव्या बंगल्याच्या मालकीण रणबीरची आई नीतू कपूर या देखील असणार आहेत. कारण ऋषी कपूर यांच्या इच्छेनुसार, नीतू कपूर या संपूर्ण मालमत्तेच्या अर्ध्या मालकीण असतील. नीतू यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी वांद्रेमध्ये १५ कोटींचं घर खरेदी केलं होतं. (Entertainment News)

Raaha Kapoor Bollywood Richest Star Kids
Pooja Singh And Karan Sharma Wedding: करण शर्मा आणि पूजा सिंगने बांधली गुपचूप लग्नगाठ, लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com