Pooja Singh And Karan Sharma Wedding: करण शर्मा आणि पूजा सिंगने बांधली गुपचूप लग्नगाठ, लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Pooja And Karan Wedding Photos: 'दिया और बाती' फेम अभिनेत्री पूजा सिंग नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.
Pooja Singh And Karan Sharma Wedding
Pooja Singh And Karan Sharma WeddingInstagram

Pooja Singh And Karan Sharma Wedding

सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठीसह हिंदी सिनेजगतातल्या सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अशातच आणखी एका सेलिब्रिटी कपलने लग्नगाठ बांधलेली आहे. 'दिया और बाती' फेम अभिनेत्री पूजा सिंग नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने 'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्यासोबत गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.

Pooja Singh And Karan Sharma Wedding
Crew 3rd Day Collection: करीना-क्रिती-तब्बू्च्या 'क्रू'चा वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर दंगा, तीन दिवसांत केली बक्कळ कमाई

करण आणि पुजाचा लग्नसोहळा मुंबईमध्ये अगदी अलिशान पद्धतीने पार पडला. या सेलिब्रिटी कपलचे ३० मार्चला कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सध्या नेटकऱ्यांकडून आवडत्या सेलिब्रिटी कपलच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

डिझायनर लेहेंग्यात पूजाचं सौंदर्य खुललेलं पाहायला मिळत आहे. तर शेरवानी सूट आणि फेट्यामध्ये करण खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरंतर, पुजा आणि करणचं हे दुसरं लग्न आहे. २०१७ मध्ये पूजाने तिचा बॉयफ्रेंड कपिल चटनानीसोबत विवाह केला होता. पण हे लग्न फार काळ टिकलेलं नाही. लग्नानंतर त्यांनी चार वर्षांतच घटस्फोट घेतला. तर २०१६मध्ये करणने टिया कौरशी लग्न केलं होतं. पण २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता पुन्हा लग्न करत पूजा आणि करणने नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे.

Pooja Singh And Karan Sharma Wedding
Vikrant Massey ने हातावर कोरला मुलगा 'वरदान'च्या नावाचा क्यूट टॅटू, फोटो तुम्ही पाहिलात का?

पूजा सिंहने 'दिया और बाती हम' आणि 'दिल से दिल तक' सारख्या शोमधून प्रसिद्धी मिळवली आहे. तर करणला 'ससुराल सिमर का २' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. त्याने 'एक नई पहचान', 'सिर्फ तुम', 'काला टीका', 'बा बहु आौर बेबी' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

Pooja Singh And Karan Sharma Wedding
Alia Bhatt ने 'Crew' चित्रपट पाहिला, नणंद करीना कपूरचं केलं कौतुक, म्हणाली...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com