Mumbai Metro Line 3 Update : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३' बाबत महत्वाची अपडेट; काम कुठपर्यंत आलं? माहिती आली समोर

Mumbai Metro Line 3 News : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३' बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला प्रथमच ही मेट्रो ट्रेन प्री-ट्रायल रनवर दाखली झाली.
 Mumbai Metro Line 3 Update : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३' बाबत महत्वाची अपडेट; काम कुठपर्यंत आलं? माहिती आली समोर
Mumbai Metro Saam tv
Published On

मुंबई : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३' बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला प्रथमच ही मेट्रो ट्रेन प्री-ट्रायल रनवर दाखली झाली. कुलाबा बांद्रा-सीप्झ मेट्रो 3 मार्गाने मंगळवारी दुपारी दादरपर्यंत ट्रेन आली. दक्षिण मुंबईतील प्रवाशांसाठी मेट्रो 3 हा महत्वाचा कॉरिडॉर आहे.

मेट्रोची पहिली ट्रेन ही दादर मेट्रो स्टेशनवर दुपारी ३ सुमारास पोहोचली. काही दिवसानंतर दादर नव्हेच तर सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनपर्यंत दक्षिणेकडे वारंवार गाड्या चालविण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं आहे.

 Mumbai Metro Line 3 Update : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३' बाबत महत्वाची अपडेट; काम कुठपर्यंत आलं? माहिती आली समोर
Mumbai News : मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई; विदेशी नागरिकाने गिळल्या होत्या ९.७५ कोटींच्या कॅप्सूल

कसा असेल मार्ग?

वरळी येथील आचार्य अत्रे चौकापर्यंत टप्पा सुरु झाल्यानंतर दादर ते सिद्धिविनायक स्टेशन प्रवाशांसाठी उघडली जाणार आहेत. या मार्गावर पहिल्या टप्प्यात (आरे-बीकेसी) , फेज दोनमध्ये सहा स्टेशन आहेत. (Mumbai)

मेट्रो एजन्सीने काय म्हटलं?

मेट्रो एजन्सीने स्पष्ट केले की, आरे आणि बीकेसी स्टेशनदरम्यान चाचण्या सुरू आहेत. परंतु जेव्हा काम पुढे जाईल. तेव्हा मेट्रो ट्रेन ही आणखी दक्षिणेकडे नेली जाऊ शकते. पहिल्या फेजमध्ये कॉरिडॉर उघडल्यानंतर दुसऱ्या फेजवरील पूर्ण चाचण्या सुरू होतील.

 Mumbai Metro Line 3 Update : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३' बाबत महत्वाची अपडेट; काम कुठपर्यंत आलं? माहिती आली समोर
Local Train Accident Death : लोकल गर्दीचे बळी सुरूच; लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, मागील २ महिन्यांतील पाचवा बळी

मेट्रोच्या तिसऱ्या फेजमध्ये कफ परेडपर्यंत चाचणीसाठी तयारी सुरू करेल. त्यात १७ स्टेशन आहेत. मेट्रो एजन्सीचा दावा आहे की, बीकेसी आणि आरे दरम्यानच्या पहिल्या फेजमध्ये 260 हून अधिक सेवा चालवण्यासाठी सुसज्ज आहे.

पहिल्या टप्पा एप्रिलमध्ये, दुसरा टप्पा जुलै आणि तिसरा ऑक्टोबरमध्ये सुरु केला जाईल, अशी घोषणा याआधी करण्यात आली होती. मात्र, मेट्रोच्या या ट्रायल रनवरून दिसून येते की, ही मुदत निघून जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com